तुमच्या या चुकांवर आयकर विभागाची करडी नजर; नोटीससाठी राहा तयार

Income Tax Notice : तुम्ही या चुका केल्या असतील तर आता आयकर विभागाची नोटीस तुम्हाला येऊ शकते. अनेक नागरिकांच्या आर्थिक सवयीवर आणि चुकांवर आयकर खात्याची करडी नजर आहे. काही अनियमितता असल्यास करदात्यांना दंड पण भरावा लागू शकते.

तुमच्या या चुकांवर आयकर विभागाची करडी नजर; नोटीससाठी राहा तयार
तर येईल नोटीस
Follow us
| Updated on: Apr 16, 2024 | 5:52 PM

आयकर विभागाने नवीन आर्थिक वर्षांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन सुविधा सुरु केली आहे. अनेक करदात्यांनी देशभरात कराचा भरणा सुरु केला आहे. इनकम टॅक्स भरताना जर तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर आयकर खाते तुम्हाल नोटीस (Income Tax Notice) पाठवू शकते. आयकर खात्याच्या तपासणीत व्यवहारात काही अनियमितता आढळल्यास तुम्हाला दंड पण भरावा लागू शकतो. त्यामुळे आयकर रिटर्न भरताना काळजीपूर्वक भरा.

  1. बँक खात्यात पैसा जमा करताना काळजी घ्या. तुम्ही सरकारी, खासगी अथवा सहकारी बँकेत वर्षभरात 10 लाख अथवा त्यापेक्षा अधिकची रक्कम जमा केली असेल तर त्याची सविस्तर माहिती प्राप्तिकर विभागाला द्या. नाहीतर तुम्ही आयकर विभागाच्या रडारवर येऊ शकता.
  2. मालमत्ता खरेदी करताना लक्ष ठेवा. एका आर्थिक वर्षात 30 लाख अथवा त्यापेक्षा अधिकची मालमत्ता रोखीत खरेदी करत असाल तर नोंदणी आणि मुद्रांक विभाग त्याची माहिती आयकर विभागाला देईल. जर तुम्ही आयटीआरमध्ये ही माहिती न दिल्यास तुमच्याकडे त्यासंबंधी विचारणा होईल.
  3. Credit Card बिलचे पेमेंट करताना ही काळजी घ्या. क्रेडिट कार्डचे बिल 1 लाख रुपयांपेक्षा अधिक असेल आणि तुम्ही ते नगदी रुपात भरत असाल तर आयकर खाते नोटीस पाठवू शकते. जर तुम्ही एका आर्थिक वर्षात 10 लाख रुपयांपेक्षा अधिक क्रेडिट कार्ड बिल पेमेंट रोखीत भरत असाल तर उत्पन्नाचा स्त्रोत सांगावा लागेल.
  4. शेअर आणि म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक पण रडारवर येऊ शकते. तुम्ही शेअर बाजार, म्युच्युअल फंड, डिबेंचर आणि बाँडमध्ये रोख पैसे गुंतवत असाल तर आयकर खाते त्याची विचारणा करु शकते. आयकर खात्याच्या नियमानुसार, एका आर्थिक वर्षात 10 लाख रुपयांपेक्षा अधिकची गुंतवणूक गोत्यात आणू शकते.
  5. हे सुद्धा वाचा
  6. मुदत ठेवीत गुंतवणूक करताना पण काळजी घेणे आवश्यक आहे. एका वर्षात तुम्ही एफडीमध्ये 10 लाख रुपयांपेक्षा अधिकची रोख रक्कम जमा करत असाल तर तुम्हाला तुमच्या उत्पन्नाचा स्त्रोताची माहिती द्यावी लागेल. डिजिटल पद्धतीने मुदत ठेवीत रक्कम गुंतवल्यास तुमच्याकडे व्यवहाराचा रेकॉर्ड असेल. तो आयकर खात्याला दाखवता येईल.
Non Stop LIVE Update
सरवणकरांच्या धनुष्यबाणाला अमित ठाकरेंचा आधार, आमने-सामने आलेत अन्...
सरवणकरांच्या धनुष्यबाणाला अमित ठाकरेंचा आधार, आमने-सामने आलेत अन्....
उद्धव ठाकरेंनी वांद्रे पूर्वेत कुटुंबासह केलं मतदान, नागरिकांना आवाहन
उद्धव ठाकरेंनी वांद्रे पूर्वेत कुटुंबासह केलं मतदान, नागरिकांना आवाहन.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कुटुंबियांसह बजावलं मतदानाचं कर्तव्य
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कुटुंबियांसह बजावलं मतदानाचं कर्तव्य.
देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कुटुंबासह नागपुरात बजावला मतदानाचा हक्क
देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कुटुंबासह नागपुरात बजावला मतदानाचा हक्क.
कांदेंनी बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी आडवली, नेमकं काय घडल
कांदेंनी बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी आडवली, नेमकं काय घडल.
'राऊतांचाच कट जिहाद झालाय, जिहादची भाषा करूनही..',भाजप नेत्याचा घणाघात
'राऊतांचाच कट जिहाद झालाय, जिहादची भाषा करूनही..',भाजप नेत्याचा घणाघात.
अजित पवार भल्या सकाळी मतदानाला, बारामती काटेवाडीत बजावला मतदानाचा हक्क
अजित पवार भल्या सकाळी मतदानाला, बारामती काटेवाडीत बजावला मतदानाचा हक्क.
शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या वाहनावर गोळीबार, नेमकं काय झालं?
शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या वाहनावर गोळीबार, नेमकं काय झालं?.
विरारमध्ये कॅश कांड, तावडेंनी ५ कोटी वाटले? कोणत्या नेत्यान दिली टीप?
विरारमध्ये कॅश कांड, तावडेंनी ५ कोटी वाटले? कोणत्या नेत्यान दिली टीप?.
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी.