Repo Rate : 12,000 किलोमीटरवरुन भारतीयांच्या खिशावर होणार महागाईचा वार! तुम्ही म्हणाल, आता हे कोणते नवं संकट

Repo Rate : दुरवरच्या या केंद्रीय बँकेच्या निर्णयाचा भारतीयांच्या खिशावर परिणाम होणार आहे. त्यामुळे पुन्हा महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. नेमका काय आहे हा प्रकार?

Repo Rate : 12,000 किलोमीटरवरुन भारतीयांच्या खिशावर होणार महागाईचा वार! तुम्ही म्हणाल, आता हे कोणते नवं संकट
महागाईचा मार
Follow us
| Updated on: Mar 08, 2023 | 6:56 PM

नवी दिल्ली : महागाईच्या (Inflation) आघाडीवर भारतीयांना दिलासा मिळण्याची शक्यता तशी धूसरच आहे. दूरवरील अमेरिकेतील केंद्रीय बँकेचा एक निर्णय भारतातील महागाईच्या आगीत तेल ओतू शकतो. त्यामुळे भारतीय नागरिकांना पुन्हा महागाईची झळ बसू शकते. यासंबंधीची ब्लू प्रिंट तयार होत आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसीमधील एक्लेस इमारतीत यावर विचारमंथन सुरु आहे. 22 मार्च रोजी अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँक (Federal Reserve Bank Of America) तिथली महागाई आटोक्यात आणण्यासाठी पुन्हा कडक पाऊल टाकण्याची शक्यता असून त्याचा फटका भारतीयांना बसणार आहे. महागाई आटोक्यात आणण्यासाठी केंद्रीय बँक व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे. हा निर्णय घेतल्यास भारतीय रिझर्व्ह बँकेलाही रेपो दरात (Repo Rate) वाढीचा निर्णय घ्यावा लागणार आहे. महागाईने भारताला ही विळखा घातला आहे. महागाईचा फास आवळल्या जात आहे. व्याज दरात वाढ झाल्यास तुमचा ईएमआय वाढणार आहे.

अमेरिकन केंद्रीय बँक व्याजदर वाढविण्यावर ठाम असल्याचा दावा करण्यात येत आहे. बँकेच्या चेअरमन जेरोम पॉवेल यांनी याविषयीचे संकेत दिले आहे. त्यांनी अद्याप याविषयीचा खुलासा केलेला नाही. परंतु, हा निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एका अंदाजानुसार, केंद्रीय बँक यावेळी 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्याची शक्यता आहे. ही सातत्याने दुसरी वेळ असेल जेव्हा व्याजदरात 50 बेसिस पॉईंटची वाढ होईल. यापूर्वी फेडरल रिझर्व्हने सलग 75 बेसिस पॉईंटची वाढ केली होती.

अमेरिकेतील महागाईचा आकडे कमी होण्याचे चिन्हं कमीच आहेत. तसेच बेरोजगारी आणि उत्पादनाच्या आकड्यांनी फारसा दिलासा दिलेला नाही. पॉवेल यांच्या संकेतानंतर सध्याचा बाजार भाव 5.5 ते 5.75 टक्क्यांच्या दरम्यान वाढला आहे. फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी मंगळवारी व्याजदर अपेक्षेपेक्षा अधिक असण्याचे संकेत दिले होते. वाढती महागाई कमी करण्यासाठी आणि मंदीचा सामना करण्यासाठी केंद्रीय बँकेने कंबर कसली आहे. या संकेतानंतर अमेरिकेतील शेअर बाजारात घसरण दिसून आली. नॅस्डॅकमध्ये 0.75 टक्के तर डाऊ जोंसमध्ये एक टक्क्यांची घट दिसून आली. S&P 500 मध्ये एक टक्क्यांची घसरण दिसून आली.

हे सुद्धा वाचा

अमेरिकन केंद्रीय बँकेच्या निर्णयाचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर दिसून येईल. भारतीय रिझर्व्ह बँकेलाही महागाई आटोक्यात आणण्यासाठी फेडरल रिझर्व्हची वाट तुडवावी लागेल. आताच आरबीआयने रेपो दरात 25 टक्के वाढ केली. येत्या काही दिवसांत व्याजदरात 25 ते 35 बेसिस पॉईंट वाढ होण्याची शक्यता आहे. भारतीय केंद्रीय बँकने मे 2022 ते फेब्रुवारी 2023 याकाळात रेपो रेटमध्ये 2.50 टक्के वाढ केलेली आहे. त्यामुळे पॉलिसी रेट 6.50 टक्क्यांवर पोहचला आहे. 8 फेब्रुवारी रोजी आरबीआयच्या पतधोरण समितीने (MPC) रेपो दरात 25 बेसिस पॉईंटची वाढ केली होती. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर ईएमआयचा बोजा पडला आहे. ग्राहक हवालदिल झाले आहेत.

'तो ठणठणीत, रिपोर्ट नॉर्मल'; कराडच्या तब्येतीवरून दमानियांचा सवाल
'तो ठणठणीत, रिपोर्ट नॉर्मल'; कराडच्या तब्येतीवरून दमानियांचा सवाल.
'पुन्हा उपोषणाची नौटंकी, आकाचे आदेश?', जरांगेंवर भाजप नेत्याची टीका?
'पुन्हा उपोषणाची नौटंकी, आकाचे आदेश?', जरांगेंवर भाजप नेत्याची टीका?.
उचलून आदळलं, बेदम मारलं... NCPच्या नगरसेवकाकडून जेष्ठ नागरिकाला मारहाण
उचलून आदळलं, बेदम मारलं... NCPच्या नगरसेवकाकडून जेष्ठ नागरिकाला मारहाण.
'...सरकारची तयारी सुरू', लाडकी बहीण योजनेवर काय म्हणाले मनोज जरांगे?
'...सरकारची तयारी सुरू', लाडकी बहीण योजनेवर काय म्हणाले मनोज जरांगे?.
निकषबाह्य अन् अपात्र 'लाडक्या बहिणीं'चे पैसे सरकार परत घेणार?
निकषबाह्य अन् अपात्र 'लाडक्या बहिणीं'चे पैसे सरकार परत घेणार?.
पद्मश्री जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ म्हणाले, 'माझी इच्छा होती, पण...'
पद्मश्री जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ म्हणाले, 'माझी इच्छा होती, पण...'.
उदय सामंत महाराष्ट्राचे तिसरे DCM? संजय राऊतांच्या 'त्या' दाव्यान खळबळ
उदय सामंत महाराष्ट्राचे तिसरे DCM? संजय राऊतांच्या 'त्या' दाव्यान खळबळ.
आकाला मिळाला दवाखाना अन् खतऱ्यात आला खजिना, कराडची संपत्ती होणार जप्त?
आकाला मिळाला दवाखाना अन् खतऱ्यात आला खजिना, कराडची संपत्ती होणार जप्त?.
गुइलेन बॅरे सिंड्रोमचा पहिला बळी; पुण्यात 73 रूग्ण, दादांची माहिती काय
गुइलेन बॅरे सिंड्रोमचा पहिला बळी; पुण्यात 73 रूग्ण, दादांची माहिती काय.
'लाडकी बहीण'वर आदिती तटकरे स्पष्ट म्हणाल्या; 'त्याला बळी पडू नये...'
'लाडकी बहीण'वर आदिती तटकरे स्पष्ट म्हणाल्या; 'त्याला बळी पडू नये...'.