OYO ची या शहरात सर्वाधिक हॉटेल बुकींग, छोट्या शहरांनी मोठ्या शहरांना टाकले मागे
2024 साल हे जागतिक पर्यटनाच्या लँडस्केपमध्ये बदलाचे वर्ष ठरले आहे. प्रवासी व्यवसायासाठी किंवा सुट्टीचा आराम करण्यासाठी लवचिक आणि अनुकूल मार्ग स्वीकारत असल्याचे कंपनीचे जागतिक मुख्य सेवा अधिकारी श्रीरंग गोडबोले यांनी सांगितले.
कोरोनाच्या जागतिक साथीनंतर देशातील धार्मिक टुरिझममध्ये वेगाने वाढ होत आहे. याचा फायदा स्वस्तात मस्त हॉटेल बुकींगची सुविधा देणाऱ्या एग्रीग्रेटर OYO ला मिळाला आहे. अलिकडेच झालेल्या सर्वेक्षणात वाराणसी आणि हरिद्वार शहरात OYO च्या हॉटलची बुकींग सर्वाधिक झाली आहे. त्यानंतर हैदराबाद, बंगळुरु, दिल्ली आणि कोलकाता सारख्या शहरातही OYO चे हॉटेल बुकिंग झाले आहे.
OYO हॉटेलच्या पाटणा, राजमुंदरी आणि हुबळीसारख्या छोट्या शहरात वार्षिक बुकिंगमध्ये 48 टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली गेली आहे. तर दिल्ली, हैदराबाद, बंगळुरु ,कोलकाता सारख्या शहरात OYO च्या हॉटलचे बुकींग चांगले झाले आहे.
या शहरात झाली सर्वाधिक बुकींग
यावर्षी ( 2024 ) वाराणसी ,पुरी आणि हरिद्वार ही सर्वाधिक धार्मिक पर्यटनाची आवडती ठिकाणे ठरली आहेत. हैदराबाद येथे सर्वाधिक बुकींग नोंदविली गेली आहे. ओयो हॉटेलने मंगळवारी एक अहवाल जारी करुन ही माहिती दिली आहे.
पुरी, वाराणसी आणि हरिद्वारमध्ये सर्वाधिक बुकींग
ट्रॅव्हल टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म OYO द्वारे ट्रॅव्हल पीडिया-2024 अहवाल जारी करण्यात आला आहे. यात प्रवाशांचा डेटा आणि ट्रेंडचे सखोल विश्लेषण करण्यात आले आहे. ओयोच्या प्लॅटफॉर्मवर वर्षभराच्या बुकिंगशी संबंधित डेटावर आधारित या अहवालाचे निष्कर्ष आहेत. भारतात यावर्षी धार्मिक पर्यटनात विशेष वाढ झाली आहे. भारतातील पुरी, वाराणसी आणि हरिद्वार शहरात सर्वाधिक बुकींग झाली आहे. तसेच देवघर, पलानी आणि गोवर्धनमध्ये पुरेसे पर्यटन झाले आहे.
IT हबमध्ये सर्वाधिक हॉटेल बुकिंग
ओयोच्या अहवालानुसार हैदराबाद, बंगळुरु, दिल्ली आणि कोलकातासारख्या शहरातील हॉटेल बुकिंग सर्वाधिक झाले. तर उत्तर प्रदेश प्रवासासाठी लोकप्रिय राज्य म्हणून आपली ओळख कायम राखली आहे. महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यातही पर्यटन झाले आहे. पाटणा, राजमुंदरी आणि हुबळीसारख्या छोट्या शहरात वार्षिक आधारे 48 टक्के वाढ नोंदविली आहे.
मुंबईचे स्थान घसरले
यावर्षी सुट्टीच्या दरम्यान पर्यटनात मोठी उलाढाल पाहायला मिळाली. जयपूर पर्यटकाच्या आकर्षणाचे केंद्र बनले होते.त्यानंतर गोवा, पुदुचेरी आणि म्हैसूर सारखे पर्यटनासाठी पंसदीची शहरे होती. मुंबईच्या पर्यटनात मात्र मोठी घसरण यंदा पाहायला मिळाली आहे.