Gautam Adani : गौतम अदानी यांच्या या कंपनीचे बदलणार नाव, तुमचा फायदा काय

Gautam Adani : अदानी समूहाच्या या कंपनीचे नाव बदलणार आहे. या नाम बदलाचा काय फायदा होईल, त्यामागील कारणं समजून घ्या...

Gautam Adani : गौतम अदानी यांच्या या कंपनीचे बदलणार नाव, तुमचा फायदा काय
Follow us
| Updated on: May 30, 2023 | 8:41 PM

नवी दिल्ली : अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडनबर्ग रिसर्चने (Hindenburg Research) अदानी समूहाची पोलखोल करण्याचा दावा केला होता. 24 जानेवारी 2023 रोजी हा दावा करण्यात आला. या फर्मच्या अहवालानंतर भारतासह जगात खळबळ माजली होती. अदानी समूहाने (Gautam Adani Group) सर्व आरोप फेटाळले होते. पण तरीही समूहाच्या सर्व शेअरमध्ये घसरणीचे सत्र सुरु झाले होते. या सर्व घडामोडीत अदानी समूहाचे मार्केट कॅप 12 लाख कोटींनी घसरले. पण नंतर हा ग्रुप सावरला. या समुहातील अनेक कंपन्यांनी जोरदार कामगिरी बजावली. गुंतवणूकदारांना लॉटरी लागली. पण आता अदानी समूहाने त्यांच्या या कंपनीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयीची माहिती त्यांनी शेअर बाजाराला दिली आहे.

अदानी ट्रान्समिशन अदानी ट्रान्समिशनच्या चौथ्या तिमाहीत जोरदार निकाल दिसून आला. कंपनीने 31 मार्च रोजी संपलेल्या तिमाहीत 85 टक्के नफा कमाविला. स्टॉक एक्सचेंजच्या फायलिंगमध्ये कंपनीने नाव बदलाची माहिती दिली. त्यानुसार, Adani Transmission चे नाव बदलण्यात येऊ शकते.

नवीन नाव काय असेल? अदानी समूहाने दिलेल्या माहितीनुसार, गौतम अदानी यांची अदानी ट्रान्समिशनचे (Adani Transmission) नाव अदानी एनर्जी सोल्यूशन्सन (Adani Energy Solutions) असे असू शकते. अदानी ट्रान्समिशनने तिमाही निकाल जोरदार दिले आहेत. कंपनीच्या संचालक मंडळाकडून नाव बदलण्याच्या प्रस्तावावर मोहर लावण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

निव्वळ 440 कोटींचा नफा चौथ्या तिमाहीच्या निकालात कंपनीने आकडे सादर केले आहेत. त्यानुसार, Adani Transmission ची आर्थिक स्थिती अत्यंत चांगली राहिली आहे. मार्च तिमाहीत कंपनीला 440 कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 237 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. कंपनीचद्या महसूलात 10 टक्क्यांची वाढ झाली. गेल्या वर्षी एकूण 3,165 कोटी रुपयांचा महसूल मिळाला तर यावर्षी कंपनीला 3,495 कोटी रुपयांचा महसूल मिळाला.

नाव बदलण्याचे कारण काय नाव बदलण्यामागील कारण कंपनीने स्पष्ट केलेले नाही. हिंडनबर्ग अहवालानंतरही कंपनीच्या महसूलात कुठेच कमी आलेली नाही. कंपनीच्या निव्वळ नफ्यातही चांगलीच वाढ झालेली आहे. या नाव बदलामुळे गुंतवणूकदारांचा नक्कीच फायदा होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

एप्रिल महिन्यात नवीन कंपनी उद्योगपती गौतम अदानी यांनी समूहाला या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी धोरणात अमुलाग्र बदल केला आहे. नवनवीन कंपन्यांच्या मार्फत अदानी समूह आता विविध क्षेत्रात नशीब अजमावत आहे. ही व्यावसायिक रणनीती हिंडनबर्ग अहवालानंतर समूहाला तारण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. अदानी समूहाची फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्राईजेस लिमिटेडतंर्गत (Adani Enterprises Ltd)ही कंपनी सुरु करण्यात आली आहे. शेअर बाजाराला याविषयीची माहिती देण्यात आली.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....