Union Budget 2023 : या अर्थमंत्र्यांच्या नावे सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा रेकॉर्ड, यादीत दुसरे नाव कोणत्या अर्थमंत्र्यांचे ?

Union Budget 2023 : अर्थसंकल्पाविषयीचे खास किस्से, कोणी सादर केले सर्वाधिक वेळा बजेट

Union Budget 2023 : या अर्थमंत्र्यांच्या नावे सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा रेकॉर्ड, यादीत दुसरे नाव कोणत्या अर्थमंत्र्यांचे ?
अर्थसंकल्प आणि किस्से
Follow us
| Updated on: Jan 14, 2023 | 10:12 AM

नवी दिल्ली : केंद्र सरकार (Central Government) दरवर्षी देशाचा आर्थिक लेखाजोखा संसदेसमोर सादर करते. देशाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात (Union Budget 2023) सरकार वर्षभराच्या खर्चाचा आणि उत्पन्नाचा हिशेब जनतेसमोर ठेवते. केंद्रीय अर्थमंत्री लोकसभेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतात. 1 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. स्वातंत्र्यानंतर दरवर्षी अर्थसंकल्प सादर होतो. सर्वाधिक वेळा कोणत्या अर्थमंत्र्याने बजेट सादर केले हे माहिती आहे का? अर्थसंकल्पाविषयीची खास माहिती जाणून घेऊयात.

देशाचे अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक वेळा संसदेत अर्थसंकल्प सादर करण्याची कामगिरी बजावली आहे. देसाई यांनी 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये 8 पूर्ण अर्थसंकल्प तर दोन अंतरिम होते. सर्वाधिक बजेट सादर करण्याचा रेकॉर्ड देसाई यांच्या नावे आहे.

अर्थमंत्री म्हणून मोरारजी देसाई यांनी 1959-60 ते 1963-64 या पाच वर्षांत त्यांनी पाच वेळा अर्थसंकल्प सादर केले. तर 1962-63 या काळात अंतरिम बजेट सादर केले. दुसऱ्यांदा ते केंद्रीय अर्थमंत्री झाल्यावर 1967-68 ते 1969-70 या काळात त्यांनी बजेट सादर केले. 1967-68 या काळात त्यांनी एक अंतरिम बजेट सादर केले.

हे सुद्धा वाचा

मोरारजी देसाई यांच्यानंतर प्रणब मुखर्जी, पी. चिंदबरम, यशवंत सिन्हा, यशवंतराव चव्हाण आणि चिंतामणराव देशमूख यांचा क्रमांक लागतो. या सगळ्यांनी प्रत्येकी सात वेळा देशाचा अर्थसंकल्प सादर केला.

तर मनमोहन सिंह आणि टी. टी. कृष्णमचारी यांनी प्रत्येकी 6 वेळा अर्थसंकल्प मांडला. माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मोदी सरकारच्या काळात 5 वेळा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर हा आकडा कमी होत गेला. काही अर्थमंत्र्यांना दोन अथवा तीनवेळा अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी मिळाली.

आर. व्यंकटरमण आणि एच. एम. पटेल यांना प्रत्येकी 3 वेळा ही जबाबदारी मिळाली. तर सर्वात कमी अर्थसंकल्प सादर करण्याचे काम पाच जणांनी केले. यामध्ये जसवंत सिंह, व्ही. पी. सिंह, सी. सुब्रमण्यम, जॉन मथाई आणि आर. के. षणमुखम यांचा क्रमांक लागतो. या तत्कालीन अर्थमंत्र्यांनी प्रत्येकी दोनदा अर्थसंकल्प सादर केला.

देशाच्या स्वातंत्र्यानंतर तत्कालीन अर्थमंत्री आर. के. षणमुखम शेट्टी यांनी 26 नोव्हेंबर 1947 रोजी पहिल्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर केला होता. जॉन मथाई हे देशाचे दुसरे अर्थमंत्री होते. त्यांनी 1949-50 मध्ये बजेट सादर केले होते.

1949-50 मधील बजेटमध्ये महागाईवर लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. याच अर्थसंकल्पात देशाला नियोजन आयोग,पंचवार्षिक योजना या शब्दांचा आणि त्याचा कार्याचा परिचय झाला. 1955-56 च्या अर्थसंकल्पापासूनच अर्थसंकल्पाशी संबंधित कागदपत्रे हिंदीतही तयार केली जातात.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....