Bata Share Price : बाटाचा या दिग्गज फुटवेअर कंपनीसोबत कदमताल! शेअर तर एकदम सूसाट

Bata Share Price : बाटा हा ब्रँड या दिग्गज फुटवेअर कंपनीसोबत कदमताल करणार आहे. या दोन कंपन्या हातमिळवणी करणार आहे. ही वार्ता शेअर बाजारात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे शेअर एकदम वधारले. कोणासोबत बाटा करत आहे हातमिळवणी?

Bata Share Price : बाटाचा या दिग्गज फुटवेअर कंपनीसोबत कदमताल! शेअर तर एकदम सूसाट
Follow us
| Updated on: Aug 17, 2023 | 6:09 PM

नवी दिल्ली | 17 ऑगस्ट 2023 : फुटवेअर क्षेत्रात अनेक दिग्गज ब्रँड आहेत. त्यात बाटा हा तर एकदम जुना ब्रँड आहे. एका बातमीमुळे बाटा इंडियाच्या शेअरने (Bata India Share) गुरुवारी अचानक उसळी घेतली. त्यामुळे गुंतवणूकदारांना सुखद धक्का बसला. शेअर बाजार बंद होत असताना हा शेअर 5.30 टक्क्यांनी वधारला. 87.20 रुपयांच्या वाढीसह हा शेअर 1733.75 रुपयांवर बंद झाला. बाटा इंडियाविषयी एक मोठी वार्ता समोर येत आहे. भारतीय बाजारात वैशिष्टयपूर्ण उत्पादनं आणण्यासाठी आणि इतर ब्रँडला टक्कर देण्यासाठी बाटा इंडियाने नवीन खेळी खेळली आहे. बाटा या दिग्गज ब्रँडसोबत हातमिळवणी करणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यासाठी तयारी पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे दोन्ही ब्रँड्स लवकरच टायअप (Tie-Up)करतील, अशी चर्चा आहे.

या कंपनीशी बांधणार गाठ

बाजारात अदिदास (Adidas) हा खेळाडूंसाठी खास उत्पादने तयार करणारा ब्रँड म्हणून ओळखल्या जातो. रनिंग, फिटनेस, स्पोर्टस या क्षेत्रातील अनेक जण हा ब्रँड वापरतात. सीएनबीसी-टीव्ही18 च्या रिपोर्टनुसार, बाटा इंडिया स्थानिक बाजारात अदिदाससोबत हातमिळवणी करणार आहे.

हे सुद्धा वाचा

लवकरच अंतिम बोलणी

या दोन्ही कंपन्यांमध्ये प्राथमिक चर्चेच्या फेऱ्या झाल्या आहेत. त्यापुढे ही चर्चा सरकली आहे. हे दिग्गज ब्रँड आता अंतिम बोलणीकडे झुकले आहेत. लवकरच याविषयीची बोलणी होणार आहे. बाटा इंडियाने स्पोर्टस वेअरची चाचपणी पण सुरु केली आहे. त्यामुळे क्रीडा क्षेत्रात या दोन्ही कंपन्या धुमाकूळ घालण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कसा आहे तिमाही निकाल

बाटा इंडियाने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 106.8 कोटींचा एकत्रित शुद्ध नफा कमावला आहे. एका वर्षांपूर्वी समान कालावधीत कंपनीच्या नफ्यात 119.3 कोटी रुपयांची, 10.3 टक्क्यांची घसरण झाली होती. या कालावधीत कंपनीचा महसूल 1.6 टक्क्यांनी वाढून 958.1 कोटी रुपये झाला. एका वर्षापूर्वी हा महसूल 943 कोटी रुपये होता.

700 शहरांमध्ये 2100 स्टोअर

काही दिवसांपासून उत्पादनात अनेक प्रयोग होत असतानाही कंपनीला मोठा फायदा झालेला दिसत नाही. कंपनीचे देशातील 700 शहरांमध्ये 2100 स्टोअर आहेत. 38 टक्क्यांहून अधिक फ्रेंचाईज आणि एसआयएस नेटवर्क आहे. बाटा इंडिया 2025 पासून फ्रेंचाईज स्टोअरची संख्या 500 पर्यंत वाढविण्याचा विचार करत आहे.

1767 पर्यंत गेला शेअर

बाटा इंडियाच्या शेअरचा भाव गुरुवारी 5.30 टक्के वा 87.20 रुपयांनी वाढला. हा शेअर 1733.75 रुपयांवर बंद झाला. व्यापारी सत्रात हा शेअर 1767.95 रुपयांपर्यंत वाढला. हा शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांक 1988.85 रुपयांवर पोहचला होता तर 52 आठवड्यांची निच्चांकी कामगिरी 1380.85 रुपये आहे. गुरुवारी या कंपनीचा बीएसईवरील बाजारातील भांडवल 22,283.46 कोटी रुपये होते.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

Non Stop LIVE Update
Ladki Bahin :आमच सरकार येताच महिलांना 8500 रूपये देणार, कोणाच वक्तव्य?
Ladki Bahin :आमच सरकार येताच महिलांना 8500 रूपये देणार, कोणाच वक्तव्य?.
लाडकी बहीणचा लाभ मुस्लिम धर्मातील 'त्या' महिलाना देऊ नका; कुणाची मागणी
लाडकी बहीणचा लाभ मुस्लिम धर्मातील 'त्या' महिलाना देऊ नका; कुणाची मागणी.
महिलांनो... आता या ॲपवरून घरबसल्या करता येणार लाडकी बहीण योजनेचा अर्ज
महिलांनो... आता या ॲपवरून घरबसल्या करता येणार लाडकी बहीण योजनेचा अर्ज.
Hathras : निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार असणारा भोलेबाबा आहे तरी कोण?
Hathras : निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार असणारा भोलेबाबा आहे तरी कोण?.
सत्संगात चेंगराचेंगरी, चिमुकले, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, एकच टाहो
सत्संगात चेंगराचेंगरी, चिमुकले, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, एकच टाहो.
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण.
'या' महिन्यात महाराष्ट्र चिंब भिजणार, तुमच्या जिल्ह्यात कसा पडणार पाऊस
'या' महिन्यात महाराष्ट्र चिंब भिजणार, तुमच्या जिल्ह्यात कसा पडणार पाऊस.
अंबादास दानवेंच्या 'त्या' शिवीगाळच्या वक्तव्यावरून ठाकरेंकडून माफी
अंबादास दानवेंच्या 'त्या' शिवीगाळच्या वक्तव्यावरून ठाकरेंकडून माफी.
विधान परिषदेच्या 11 जागा अन् 12 जण रिंगणात, कोणाची मतं फुटणार?
विधान परिषदेच्या 11 जागा अन् 12 जण रिंगणात, कोणाची मतं फुटणार?.
लाडकी बहीण योजना, सरकारनं बदलला निर्णय, या कागदपत्रांशिवाय मिळणार 1500
लाडकी बहीण योजना, सरकारनं बदलला निर्णय, या कागदपत्रांशिवाय मिळणार 1500.