Tata Group : हा प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड टाटा समूहात! इतक्या हजार कोटींत केली खरेदी
Tata Group : आता हा प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड आता टाटा समूहात दाखल झाला आहे. तो तनिष्क ग्रुपचा आता भाग असेल. त्यामुळे तनिष्काला व्यवसाय वृद्धीला संधी मिळेल. उद्योगपती रतन टाटा यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योग रत्न पुरस्कार आज प्रदान करण्यात आला.
नवी दिल्ली | 19 ऑगस्ट 2023 : तनिष्क हा टाटा समूहाचा (Tata Group -Tanishq) प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड आहे. ही समूहातील अग्रगण्य कंपनी आहे. तनिष्क ज्वेलरीचे भारतात अनेक शहरात शो-रुम आहेत. त्यामाध्यमातून कोट्यवधीची उलाढाल होते. तनिष्कने अमेरिकेत पहिले स्टोअर नुकतेच सुरु केले आहे. हा आता जागतिक ब्रँड झाला आहे. न्यू जर्सी येथे हे नवीन स्टोअर सुरु करण्यात आले आहे. यापूर्वी दुबईत कंपनीने नोव्हेंबर 2020 मध्ये पहिले स्टोअर सुरु केले होते. उत्तर अमेरिका आणि पश्चिम आशियात येत्या दोन-तीन वर्षांत तनिष्क 20-30 स्टोअर सुरु करणार आहे. आज शनिवारी, टाटा समूहाचे प्रमुख आणि उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचा महाराष्ट्र सरकारने पुरस्कार देऊन गौरव केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योग रत्न पुरस्कार देण्यात आला.
हा समूह ताफ्यात
प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड कॅरेटलेन आता टाटा समूहाचा भाग असेल. टाटा समूहाच्या तनिष्क ग्रुपमध्ये हा ब्रँड दाखल झाला आहे. कॅरेटलेनने 27 टक्के हिस्सेदारी विक्री केली होती. टाटा समूहाने कॅरेटलॅन यांच्यामध्ये करार झाला. टाटा समूहाने या कंपनीतील उर्वरीत सर्व हिस्सेदारी खरेदी केली. शनिवारी टायटन कंपनीने कॅरेटलेन कंपनीतील उर्वरीत 27 टक्के हिस्सेदारी खरेदी केली. त्यामुळे ही कंपनी आता टाटा समूहाचा हिस्सा झाली आहे.
इतक्या कोटीत केली खरेदी
प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड कॅरेटलेन आता तनिष्कचा भाग असेल. टाटा समूहाच्या टायटन कंपनीने ही डील पूर्ण केली. जवळपास 4621 कोटी रुपयांत हा व्यवहार पूर्ण झाला. या कंपनीत पूर्वीपासूनच टायटनची हिस्सेदारी होती. आता या खरेदीमुळे हा ब्रँड पूर्णपणे टायटनचा झाला आहे. कॅरेटलेनचे सीईओ सचेती आणि त्यांच्या कुटुंबियांकडे या कंपनीचे 91,90,327 इक्विटी शेअर होते. पण टायटन कंपनीने हे शेअर खरेदी केले आहे. या खरेदीमुळे कॅरेटलेनचे शोरुम, स्टोअर्स आता टायटनच्या मालकीची झाली आहे. त्याठिकाणी टायटनला व्यवसाय वृद्धीची संधी मिळाली आहे.
जगभरात तनिष्कचे शोरुम
टायटनने दुबईत नोव्हेंबर 2020 मध्ये तनिष्कचे पहिले स्टोअर सुरु केले होते. त्यानंतर आता तनिष्कने अमेरिकेत पहिले स्टोअर नुकतेच सुरु केले आहे. तनिष्क आता जागतिक ब्रँड झाला आहे. न्यू जर्सी येथे हे नवीन स्टोअर सुरु करण्यात आले आहे. कंपनीने उत्तर अमेरिका आणि पश्चिम आशियात स्टोअर सुरु करण्याची तयारी सुरु केली आहे. येत्या दोन-तीन वर्षांत तनिष्कचे जगभर 20-30 स्टोअर असतील.