Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narayana Murthy : जणू फिल्मी लव्ह स्टोरीच! पुण्याने फुलवली Infosys चे नारायण मूर्ती यांची अनोखी प्रेमी कहाणी..

Narayana Murthy : इन्फोसिसचे मालक नारायण मूर्ती आणि त्यांच्या सहचरणी सुधा मूर्ती यांच्या प्रेम विवाहाची गोष्ट एखाद्या चित्रपटाच्या पटकथेला शोभणारी आहे. आयुष्यात अनेक चढउतार आल्यावरही या दोघांची एकमेकांना अजूनही साथ आहे.

Narayana Murthy : जणू फिल्मी लव्ह स्टोरीच! पुण्याने फुलवली Infosys चे नारायण मूर्ती यांची अनोखी प्रेमी कहाणी..
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 10:56 AM

नवी दिल्ली : भारतातील दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिस आणि तिचे मालक नारायण मूर्ती (Narayana Murthy), आणि त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांना कोण ओळखत नाही. नारायण मूर्ती यांना पाहुन तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही की हा एवढा कामात गर्क माणूस या प्रेमाच्या वाटेवर कसा चालला. तर नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचे प्रेम फुलले ते आपल्या पुण्यात. त्यांची प्रेम विवाहाची गोष्ट एखाद्या चित्रपटाच्या पटकथेला शोभणारी आहे. इन्फोसिस (Infosys) आज देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी आहे. या कंपनीचा स्थापना 1981 मध्ये एन आर नारायण मूर्ती आणि त्यांच्या सहा अभियंत्यांनी अगदी कमी संसाधनात केली होती. गेल्या चार दशकात या कंपनीने आयटी क्षेत्रात मोठा दबदबा तयार केला आहे.

सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती यांची प्रेम कहाणी पुण्यातील टाटा इंजिनिअरिंग आणि लोकमोटिव्ह कंपनी अर्थात टेल्को (TELCO) या कंपनीत फुलली. दोघेही सोबत काम करत होते. एका मित्राच्या घरी त्यांची ओळख झाली.दोघांमध्ये मैत्री फुलली. पुढे प्रेम खुलले आणि दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय पक्का केला.

” माझी उंची 5 फुट 4 इंच आहे. मी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. मी जीवनात कधी श्रीमंत होईल की नाही, माहिती नाही. तू कुशाग्र आणि हुशार आहेस, माझ्याशी लग्न करशील का?” अशा फिल्मी स्टाईलने सुधा मूर्ती यांना नारायण मूर्ती यांनी प्रेमाची साद घातली होती. गंमत म्हणजे, दोघेही जेव्हा भेटायचे. तेव्हा बिल सुधा मूर्ती भरायच्या. त्यावेळी नारायण मूर्ती यांच्याकडे पैसे नसायचे.

हे सुद्धा वाचा

नारायण मूर्ती यांचा तोकडा पगार हा सुधा मूर्ती यांच्या वडिलांसाठी चिंतेचा विषय होता. त्यांची याच कारणामुळे या नात्यावर नाराजी होती. परंतु, प्रेम अतूट असेल तर ते कोणत्याही परिस्थितीत जुळतेच. काही दिवसांनी सुधा मूर्ती यांच्या वडिलांनी लग्नाला होकार भरला. दोन्ही कुटुंबांच्या उपस्थितीत 10 फेब्रुवारी 1978 रोजी बेंगळुरु येथे दोघेही लग्न बेडीत अडकले.

इन्फोसिसच्या स्थापनेत सुधा मूर्ती यांचा मोठा आर्थिक हातभार आहे. त्यांच्या बचतीतून या कंपनीचा पाया ठेवण्यात आला. त्यांनी कंपनी स्थापण्यावेळी 10 हजार रुपये दिले होते. नारायण मूर्ती यांच्याकडे तर साधे ऑफिसचे भाडे भरण्याइतकाही पैसा नव्हता. ही कंपनी सुरु झाल्याच्या 6 महिन्यानंतर 2 जुलै, 1981 रोजी इन्फोसिस प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कंपनीची नोंदणी झाली. मूर्ती यांच्या घराच्या पुढील भागात इन्फोसिसचे कार्यालय सुरु झाले.

1981 मध्ये नारायण मूर्ती, नंदन नीलेकणी, एस गोपालकृष्णन, एसडी शिबुलाल, के दिनेश आणि अशोक अरोडा यांनी पटनी कम्प्यूटर सोडले आणि त्यांनी इन्फोसिस कन्सल्टेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची सुरुवात केली. त्यांना 1983 मध्ये न्यूयॉर्क कंपनीकडून डेटा बेसिक कॉर्पोरेशनकडून पहिली ऑर्डर मिळाली होती. आज या कंपनीत 50 हजारांहून अधिक कर्मचारी आहेत. 12 हून अधिक देशात इन्फोसिसचे जाळे पसरले आहे.

जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे
जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे.
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार.
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय.
जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट
जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट.
नैसर्गिक रंगात न्हाऊन निघत धसांनी लुटला धुळवडीचा आनंद
नैसर्गिक रंगात न्हाऊन निघत धसांनी लुटला धुळवडीचा आनंद.
बापाच्या आठवणीने व्याकूळ, भास होताच वैभवीनं रेखाटलं देशमुखांचं चित्र
बापाच्या आठवणीने व्याकूळ, भास होताच वैभवीनं रेखाटलं देशमुखांचं चित्र.
वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?
वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?.
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका.
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी.
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय...
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय....