Multibagger Stock : 500 टक्क्यांहून अधिक परतावा! आता बोला, तुमच्या पोर्टफोलिओत आहे का हा मेटल स्टॉक

Multibagger Stock : या मल्टिबॅगर स्टॉकमुळे गुंतवणूकदारांची जोरदार कमाई झाली. त्यांना 500 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे.

Multibagger Stock : 500 टक्क्यांहून अधिक परतावा! आता बोला, तुमच्या पोर्टफोलिओत आहे का हा मेटल स्टॉक
Follow us
| Updated on: Apr 22, 2023 | 4:29 PM

नवी दिल्ली : शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूकदार अशा स्टॉकच्या शोधात असतात, जो झटपट कमाई करुन देईल. काही स्टॉक तर लॉटरी सारखे असतात. खरेदीनंतर काही दिवसांतच तुम्हाला मालामाल करुन टाकतात. हे मल्टिबॅगर स्टॉक (Multibagger Return) जोरदार परतावा देतात. ते गुंतवणूकदारांची गुंतवणूक अनेक पटीने वाढवतात. दीर्घकालीन गुंतवणूकदारांना तर या मल्टिबॅगर स्टॉकने कोट्याधीश केले आहे. पण त्यासाठी कंपनीचा व्यवस्थित अभ्यास करणे गरजेचे असते. तसेच बाजारातील तज्ज्ञांचा सल्ला ही गरजेचा असतो. नाहीतर खिशाला नाहक चाट बसते.

आता किती आहे किंमत मेटल कंपनी स्टीलकास्ट लिमिटेडच्या शेअरची किंमत (Steelcast Ltd Share Price) किती आहे? तर या कंपनीने गेल्या तीन वर्षांत जोरदार 526 टक्के परतावा दिला आहे. शुक्रवारी हा शेअर बीएसईवर जवळपास स्थिर होता. हा शेअर 475 रुपयांच्या स्तरावर बंद झाला. हा आठवडा या शेअरसाठी मोठा लकी नव्हता. स्टीलकास्ट लिमिटेडच्या शेअरची किंमत या आठवड्यात जवळपास 3.50 टक्के घसरली.

शॉर्ट टर्ममध्ये रिटर्न कमी स्टीलकास्ट लिमिटेडचा शेअरमध्ये एका महिन्यात जवळपास 5.50 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर गेल्या सहा महिन्यात यामध्ये जवळपास 6 टक्के मजबूत झाला. यावर्षी हा शेअर मोठी कामगिरी बजावू शकला नाही. या वर्षात हा शेअर केवळ 2.30 टक्के धाव घेऊ शकला. या शॉर्ट टर्ममध्ये या शेअरने मोठा पल्ला गाठला नाही. मात्र दीर्घकालीन गुंतवणूकदारांना त्याचा चांगला फायदा झाला.

हे सुद्धा वाचा

वर्षभरात इतकी वृद्धी तज्ज्ञांच्या मते, हा शेअर बाजारातील त्या गुंतवणूकदारांसाठी आहे, जे दीर्घकालीन गुंतवणुकीत विश्वास ठेवतात. स्टीलकास्ट लिमिटेडने ही गोष्ट सिद्ध केली आहे. गेल्या एका वर्षात या शेअरने 30 टक्के परतावा दिला आहे. तर गेल्या तीन वर्षांतील रिटर्न तर आश्चर्यचकित करणारे आहेत. स्टीलकास्ट लिमिटेडच्या शेअरचा भाव 526 टक्क्यांनी वधारला आहे.

गुंतवणूकदार मालामाल तीन वर्षांपूर्वी 21 एप्रिल 2020 रोजी या कंपनीचा एक शेअर 75.85 रुपयांना मिळत होता. आज या शेअरची किंमत 475 रुपये आहे. याचा अर्थ जर एखाद्या व्यक्तीने स्टीलकास्ट लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये तीन वर्षांपूर्वी एक लाख रुपये गुंतवणूक केली असती, तर आज तो मालामाल झाला असता. त्याच्या एक लाख रुपयांचे आज 6.26 लाख रुपये झाले असते. या तीन वर्षांत BSE Sensex ने जवळपास 95 टक्के परतावा दिला.

कंपनी एकदम सक्रीय या शेअरने गेल्या 52 आठवड्यात उच्चांकी 572 रुपयांचा स्तर गाठला. 28 फेब्रुवारी 2023 रोजी कंपनीने ही कामगिरी केली. तर 271.25 रुपये हा या कंपनीचा 52 आठवड्यातील निच्चांकी स्तर आहे. गेल्या वर्षी 25 मे 2022 रोजी हा निच्चांक गाठला होता. ही मेटल कंपनी अर्थ मुव्हिंग, मायनिंग, मिनरल प्रोसेसिंग, स्टील प्लँट या सारख्या क्षेत्रात ओरिजनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चररची भूमिका निभावत आहे. या कंपनीचे बाजार मूल्य जवळपास 960 कोटी रुपये आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.