Property : घर बसल्या स्वस्तात खरेदी करा घर! सरकारी बँका करणार जागर

Property : आता मालमत्ता खरेदी करणे अधिक सोपे झाले आहे. घर बसल्या स्वस्तात मालमत्ता खरेदी करता येईल. त्यासाठी सरकारी बँका जागर करणार आहेत. ई-ऑक्शनच्या माध्यमातून तुम्हाला फायदा होईल.

Property : घर बसल्या स्वस्तात खरेदी करा घर! सरकारी बँका करणार जागर
Follow us
| Updated on: Apr 20, 2023 | 5:30 PM

नवी दिल्ली : स्वतःचे घर खरेदी करणे, प्रॉपर्टी (Property) खरेदी करणे सोपे काम नाही. त्यासाठी अनेक साईट्स पहाव्या लागतात. अनेक प्रकल्पांना भेट द्यावी लागते. पण आता तुम्हाला घर बसल्या मालमत्ता खरेदी करता येणार आहे. तेही योग्य भावात. येत्या काही दिवसांत ग्राहकांना घर बसल्या किफायतशीर दरामध्ये चांगली मालमत्ता मिळेल. विशेष म्हणजे प्रॉपर्टी खरेदी करण्यात कोणतीही फसवणूक होणार नाही. त्यासाठी सरकारी बँकांनी (Government Bank) एक खास योजना आखली आहे. त्यामाध्यमातून देशातील कोणत्याही भागातील प्रॉपर्टी तुम्हाला सहज आणि स्वस्तात खरेदी करता येईल.

ई-ऑक्शन ॲप लवकरच आता सरकारी बँक मालमत्तांच्या लिलावासाठी एक खास मोबाईल ॲप तयार करत आहे. त्यामाध्यमातून लवकरच ई-ऑक्शन ॲप तयार होणार आहे. ॲपच्या माध्यमातून 5 लाखांहून अधिकच्या मालमत्तांची ई-लिलाव (E-Auction) करण्यात येईल. लिलावातील घरांच्या किंमती बिल्डरकडील किंमतींपेक्षा कमी असतात. अनेक जण घर खरेदी करतात. पण पुढे हप्ते न फेडल्याने त्यांचे घर जप्त होते. पुढे संधी देऊनही काहीच उपाय न केल्याने वसुलीसाठी बँका या घरांचा लिलाव करतात.

5 लाखांपेक्षा जास्त मालमत्ता याविषयीच्या अहवालानुसार, सरकारी बँका या ई-लिलाव ॲपच्या माध्यमातून पुढील प्रक्रिया पूर्ण करणार आहे. तसेच ग्राहकांना ॲपच्या माध्यमातून त्यांच्या जवळचीच तारण मालमत्ता स्वस्तात मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सर्व माहिती, सूचना, दस्तावेज आणि टोकन क्रमांका हा ॲपच्या माध्यमातून जनरेट होईल. ॲपच्या माध्यमातून ग्राहकांना सोप्या पद्धतीने मालमत्ता खरेदीची संधी मिळेल. जप्त केलेली मालमत्ता सहजरित्या ग्राहकांना उपलब्ध होईल. 5 लाखांपेक्षा जास्त मालमत्ता ई-लिलावाच्या माध्यमातून विक्री करण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

eBkray चा श्रीगणेशा वर्ष 2019 मध्ये, इंडियन बँक्स असोसिएशनने बँकांद्वारे अटॅच्ड प्रॉपर्टीच्या ऑनलाईन लिलावासाठी एक पोर्टल, eBkray ची सुरुवात केली. हे पोर्टल सार्वजनिक क्षेत्रातील बँका (PSB) ई-लिलाव साईट आणि प्रॉपर्टी (Property) सर्चसाठी नेव्हिगेशन लिंक उपलब्ध करतील. या ॲपवर लिलाव होणाऱ्या सर्व मालमत्तांची माहिती उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. देशातील अनेक ठिकाणच्या मालमत्तांची माहिती एका क्लिकवर ग्राहकांना उपलब्ध असेल. त्यामाध्यमातून योग्य किंमत, बोली लावणाऱ्या ग्राहकांना ही मालमत्ता उपलब्ध होईल.

किफायतशीर दर बँकांच्या ई-लिलावा संबंधीची माहिती या ॲपवर असेल. देशातील सर्वच सरकारी बँका त्यांच्या लिलाव होणाऱ्या सर्व मालमत्तांची माहिती याठिकाणी टाकतील. त्यासाठी ॲप विकसीत करण्यात येत आहे. जुन्या ॲपपेक्षा हे ॲप अधिक जलद आणि सुविधाजनक असेल. यामाध्यमातून ग्राहकांना स्वस्त आणि किफायतशीर दरात घर खरेदी करता येईल.

Non Stop LIVE Update
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...