6 रुपयांच्या शेअरचा षटकार; परतावा दिला शानदार, 1 लाखांचे झाले इतके कोटी
Multibagger Stock : कोविडनंतर काही स्टॉकनी रॉकेट भरारी घेतली. काही स्टॉकनी मल्टिबॅगर रिटर्न दिला आहे. अशाच एका स्टॉकने गुंतवणूकदारांना मोठा दिलास दिला आहे. या स्टॉकने शेअरधारकांना कोट्याधीश केले आहे. कोणता आहे हा स्टॉक, किती दिला परतावा?
कोविडनंतर असे अनेक स्टॉक आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या शेअर्सनी गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर रिटर्न दिला आहे. ट्रासफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स लिमिटेडने (TRIL) असाच काहीसा चमत्कार केला आहे. या स्टॉकमध्ये मंगळवारी जोराद विक्री सत्र आले. मे 2020 मध्ये NSE वर 6.30 रुपये प्रति शेअरपेक्षा निच्चांकी स्तरावर पोहचला होता. त्यानंतर त्यात मोठी रिकव्हरी आली. आता हा शेअर 626 रुपयांवर पोहचला आहे. या शेअरने चार वर्षांत 100 पट फायदा मिळवून दिला.
आता किती दिला परतावा
- TRIL चा शेअर एका महिन्यात एनएसईवर 415.50 रुपयांवरुन वाढून 626.50 रुपयांवर पोहचला. त्यामुळे शेअरधारकांना 50 टक्के रिटर्न मिळाला. वार्षिकआधारावर हा मिड-कॅप स्टॉक जवळपास 238 रुपयांहून वाढून 626.50 रुपये प्रति शेअर झाला. 2024 मध्ये या शेअरमध्ये 160 टक्क्यांची वृद्धी दिसून आली.
- गेल्या 6 महिन्यात TRIL च्या शेअरची किंमत जवळपास 161 रुपयांहून 626.50 रुपये प्रति शेअरवर पोहचली आहे. या कालावधीत हा शेअर जवळपास 300 टक्क्यांची वृद्धी दिसून आली. एका वर्षात हा शेअर सूसाट धावला. या शेअरने 850 टक्क्यांचा परतावा दिला आहे. चार वर्षांत या शेअरची किंमत शंभर पटीने वाढली आहे. हा शेअर मे 2020 मध्ये 6.30 रुपयांवर होता. आता तो 626.50 रुपयांवर पोहचला आहे.
करोडपती करणारा शेअर
- TRIL च्या शेअरमध्ये एखाद्या गुंतवणूकदाराने सहा महिन्यांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते. तर आज ही रक्कम 4 लाख रुपये झाली असती.
- एका वर्षापूर्वी एक लाख गुंतवले असते तर आज त्याचा परतावा 9.50 लाख मिळाला असता.
- कोविड काळात एक लाख गुंतवले असते तर त्याची रक्कम आज 1 कोटी रुपये असती.
- या स्टॉकचा 52 आठवड्यातील निच्चांक 63.05 रुपये तर उच्चांक 769.10 रुपये आहे.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.