Multibagger Stocks : 10 हजारांचे झाले 16 लाख, गुंतवणूकदारांनी खोऱ्याने ओढला पैसा

Multibagger Stocks : या मल्टिबॅगर स्टॉकने कमाल केली. गुंतवणूकदारांनी एकदम खोऱ्याने पैसे ओढले. आता या कंपनीच्या स्टॉक विषयी तज्ज्ञांनी हे फायद्याचे गणित सांगितले आहे.

Multibagger Stocks : 10 हजारांचे झाले 16 लाख, गुंतवणूकदारांनी खोऱ्याने ओढला पैसा
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 6:11 PM

नवी दिल्ली : शेअर बाजारातून (Share Market) प्रत्येक जण फायद्याची अपेक्षा करतो. गुंतवणूक 20%, 50% इतका डबल व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. शेअर बाजारात तुमचे नशीब धावले तर रक्कम 10 पटीत नाही तर 100 पटीनं वाढते. बाजारात काही पण चमत्कार होऊ शकतो. दीर्घकालीन गुंतवणूकदारांना तर अधिक फायदा होतो. लॉर्ज कॅप शेअर्सने (Large Cap Share) पण गुंतवणूकदारांची रक्कम 100 पटीनं वाढवली आहे. अशाच एका मल्टिबॅगर शेअरने (Multibagger Share) गुंतवणूकदारांचा मोठा फायदा करुन दिला आहे. या शेअरने 10 हजार रुपयांचे 16 लाख रुपये केले आहे. आता या कंपनीच्या स्टॉक विषयी तज्ज्ञांनी हे फायद्याचे गणित सांगितले आहे.

10 वर्षात तुफान परतावा या मल्टिबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना जोरदार फायदा मिळवून दिला. या शेअरने 10 वर्षात गुंतवणूकदारांना मालामाल केले. 10 वर्षात या शेअरने 16,000 टक्क्यांचा परतावा दिला. केआयई इंडस्ट्रीजच्या शेअरने (KEI Industries Share) कोणाला लखपती तर कोणाला कोरडपती केले. दहा वर्षांपूर्वी ज्यांनी गुंतवणूक करुन ती तशीच ठेवली, होल्ड केली. त्यांना आज मोठा फायदा झाला.

10 हजाराचे 16 लाख एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 10,000 रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 16 लाख रुपये झाले असते. हा शेअर गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने घौडदौड करत आहे. या दरम्यान या शेअरने 520 टक्क्यांची उसळी घेतली आहे. या वर्षात या शेअरमध्ये 19 टक्के तेजी आली आहे.

हे सुद्धा वाचा

काय करते कंपनी? केआयई कंपनी बीएसई 500 मधील एक कंपनी आहे. या कंपनीचे बाजारातील भांडवल 15,700 कोटी रुपये आहे. ही कंपनी बांधकाम क्षेत्र, संरक्षण, टेलीकम्युनिकेशन आणि दुसऱ्या व्यवसायात अग्रेसर आहे. केबल, स्टेनलेस स्टील वायर निर्मितीत ही कंपनी आहे.

शेअरहोल्डिंग पॅटर्न बीएसईवरील ताज्या आकडेवारीनुसार या कंपनीचे शेअरहोल्डिंग पॅटर्न समोर आले आहे. त्यानुसार, कंपनीतील 62.68 टक्के वाटा शेअरधारकांकडे आहे. तर प्रमोटर्सचा 37.32 टक्के वाटा आहे. पब्लिक शेअरहोल्डर्समध्ये म्युच्युअल फंड 15.50 टक्के, परदेशी गुंतवणूकदारांकडे 27 टक्के, किरकोळ गुंतवणूकदारांकडे 13.76 टक्के हिस्सेदारी आहे.

विक्रीत जोरदार वाढ आर्थिक वर्ष 2013 मध्ये KEI Industries ची विक्री 1690 कोटी रुपये होती. आर्थिक वर्ष 2022 मध्ये विक्री वाढून 5,726 कोटी रुपये झाली. या काळात PAT 26 कोटी रुपयांहून वाढून 376 कोटी रुपये झाला. डिसेंबर तिमाहीपर्यंतच्या 9 महिन्यात कंपनीचा महसूलात दरवर्षी 26 टक्क्यांची वाढ झाली. कंपनीला 339 कोटींचा फायदा झाला.

काय आहे लक्ष्य गेल्या 2 वर्षात या शेअरमध्ये जोरदार तेजी आली आहे. सध्या हा शेअर 1470 पेक्षा अधिकवर व्यापार करत आहे. तज्ज्ञांच्या मते ही कंपनी येत्या काही वर्षात अधिक परतावा देईल. त्यामुळे या कंपनीच्या शेअरमधील घसरण ही पण गुंतवणुकीची संधी आहे. तज्ज्ञांच्या मते 2100 रुपये लक्ष्य सांगितले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना अजून फायदा होऊ शकतो.

हा कोणताही गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांना कंपनीचा अभ्यास आणि तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्यावा.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.