Gautam Adani : 1700 रुपयांचा टप्पा ओलांडणार; गौतम अदानी यांचा शेअर कमाल करणार

Share Market : तज्ज्ञांच्या मते, गौतम अदानी यांच्या समूहातील हा शेअर मोठी उसळी घेऊ शकतो. शेअर बाजार सध्या तेजीचे सत्र सुरु आहे. आज सकाळच्या सत्रात निफ्टीसह सेन्सेक्सने मोठा पल्ला गाठला आहे. हा शेअर लवकरच 1700 रुपयांचा टप्पा ओलांडणार असल्याचे भाकित करण्यात येत आहे.

Gautam Adani : 1700 रुपयांचा टप्पा ओलांडणार; गौतम अदानी यांचा शेअर कमाल करणार
अदानी करणार गुंतवणूकदारांना मालामाल
Follow us
| Updated on: May 03, 2024 | 11:35 AM

शुक्रवारी शेअर बाजाराने नवीन उच्चांक गाठला. अदानी समूहाची कंपनी अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिक झोनच्या शेअरने शुक्रवारी तेजी नोंदवली. हा शेअर 1354.40 रुपयांवर व्यापार करत होता. अदानी पोर्ट्सचा शेअर त्याच्या 52 आठवड्यातील उच्चांकाच्या जवळपास आहे. मार्केटमधील तज्ज्ञानुसार, अदानी पोर्ट्सच्या शेअरमध्ये तेजीचे सत्र येऊ शकते. हा शेअर 1700 रुपयांच्या घरात पोहचू शकतो. काही ब्रोकरेज हाऊसने मार्च 2024 नंतरच्य तिमाही निकालानंतर हा शेअर मजबूत होण्याचा दावा केला होता. या शेअरचा 52 आठवड्यातील उच्चांक 1425 रुपये आहे.

Citi ने ठेवले 1782 रुपयांचे टार्गेट

ग्लोबल ब्रोकरेज हाऊस सिटीने (Citi) अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिक झोनच्या शेअरसाठी टार्गेट प्राईस 1782 रुपये इतकी केली आहे. सध्याच्या बाजारातील मूल्यापेक्षा अदानी पोर्ट्समध्ये 33 टक्के उसळी येण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. कंपनीच्या मार्च महिन्यात तिमाही निकालाने ब्रोकरेज हाऊसचे धाडस वाढवले. त्यांच्या मते हा शेअर सहज 1700 रुपयांचे टार्गेट पूर्ण करेल. जेफरीज, HSBC हे ब्रोकरेज हाऊस सध्या अदानी पोर्ट्सवर फिदा आहेत. त्यांनी अनुक्रमे 1640 रुपये आणि 1560 रुपयांचे टार्गेट समोर ठेवले आहे.

हे सुद्धा वाचा

एका वर्षात डबल केला पैसा

अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिक झोनच्या शेअरने गेल्या एका वर्षात 100 टक्के परतावा दिला आहे. कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना डबल परतावा दिला आहे. अदानी पोर्ट्सचा शेअर 3 मे 2023 रोजी 669.85 रुपयांवर ट्रेड करत होता. कंपनीचे शेअर 3 मे 2024 रोजी 1354.30 रुपयांवर पोहचला. तर गेल्या 6 महिन्यात अदानी पोर्ट्सच्या शेअरमध्ये 69 टक्क्यांची तेजी दिसून आली. कंपनीचा शेअर 3 नोव्हेंबर 2023 रोजी 795.45 रुपयांवर होता. तो आता 1350 रुपयांवर पोहचला आहे. अदानी पोर्ट्सचा 52 आठवड्यातील निच्चांक 659.85 रुपये आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.