Gold Price : या राज्यात कुठेही खरेदी करा, सोन्याचा भाव एकच! ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद, तुम्हाला कधी मिळेल फायदा?

Gold Price : एकाच शहरातील विविध भागातील सराफा दुकानात सोन्याच्या भावात तफावत असते..पण या राज्यात आता असे होणार नाही..

Gold Price : या राज्यात कुठेही खरेदी करा, सोन्याचा भाव एकच! ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद, तुम्हाला कधी मिळेल फायदा?
एकच दामImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 17, 2022 | 4:23 PM

नवी दिल्ली : एकाच शहरातील विविध भागातील सराफा दुकानातील (Sarafa Shop) सोन्याच्या भावात (Gold Rate) तुम्हाला तफावत आढळल्यास शिवाय राहत नाही. पण एका राज्यात या तफावतीला आता ब्रेक लागला आहे. या राज्यातील (State) कोणत्याही सोन्याच्या दुकानात गेला तर तुम्हाला सोन्याचा एकच भाव (Uniform Gold Rate) मिळेल. त्याचा ग्राहकांनाही फायदा होणार आहे.

शिक्षणात देशात अग्रेसर असलेल्या केरळ राज्यात (Kerala State) हा अभिनव प्रयोग सुरु झाला आहे. सोन्यासाठी संपूर्ण राज्यात एकच दाम आकारणारे केरळ हे देशातील पहिले राज्य (First State In India) ठरले आहे. देशात असा प्रयोग इतर राज्यातही सुरु होणार आहे. पण त्यासाठी किती कालावधी लागेल हे सांगता येत नाही.

Uniform Gold Price ही अभिनव योजना लागू झाल्यानंतर केरळमध्ये सोन्याचे दर ठरविण्यासाठी एक खास पद्धत लागू करण्यात आली आहे. त्यासाठी बँकांच्या सोन्याच्या दराचा आधार घेण्यात येणार आहे. राज्यातील सर्व दुकानदारांना हा नियम लागू असेल.

हे सुद्धा वाचा

केरळ राज्यातील प्रत्येक सराफा दुकानात सोने एकाच भावाने विक्री होणार आहे. पण हा नियम 916 शुद्धतेच्या 22 कॅरेट सोन्याला लागू असेल. सध्या देशातील प्रत्येक शहरात सोन्याचे दर वेगवेगळ आहेत.

देशात सोन्याच्या किंमती या आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरु असलेले भाव, सोन्याची मागणी आणि येत्या काळातील सोन्याच्या भावातील चढ-उताराचा अंदाज या आधारे ठरविण्यात येतात. पण ज्वेलर्स त्यांच्या राज्यातील, शहरातील भावानुसार सोन्याची विक्री करतात.

केरळमधील प्रमुख ज्वेलर्स मालाबार गोल्ड अँड डायमंड्स, जायअलूकास आणि कल्याण ज्वेलर्सने यासाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या आठवड्यातील बँक दराच्या आधारे ग्राहकांना एकाच भावाने सोने उपलब्ध करुन देण्यात आले.

लग्न सराईच्या तोंडावर ग्राहकांना आता राज्यात कुठेही एकाच भावाने सोने मिळणार असल्याने त्यांना फायदा होणार आहे. केवळ सोने खरेदीसाठी त्यांना एखाद्या मोठ्या शहरात जाण्याची आवश्यकता नसेल.

दागिने तयार करण्यासाठी 916 शुद्धतेच्या 22 कॅरेट सोन्याचा वापर करण्यात येतो. सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव 48,435 रुपये आहे. 24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध मानण्यात येते. पण सोन्याची आभूषण तयार करण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करण्यात येतो.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.