Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Richest State : इथूनच जातो देशाच्या श्रीमंतीचा राजमार्ग, भारताचे हे राज्य सर्वात धनवान!

Richest State : देशात कोणते राज्य सर्वात श्रीमंत असेल बरं? काय अंदाज लावाल तुम्ही, कोणते राज्य डोळ्यासमोर येते? या राज्यातून देशाच्या श्रीमंतीचा राजमार्ग जातो. हे भारतातील सर्वात धनवान राज्य आहे.

Richest State : इथूनच जातो देशाच्या श्रीमंतीचा राजमार्ग, भारताचे हे राज्य सर्वात धनवान!
Follow us
| Updated on: Jul 12, 2023 | 4:41 PM

नवी दिल्ली : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. अनेक भाषा, बोलीभाषा, संस्कृती, पंरपरा, प्रथा, पुजा पद्धती सर्वच काही अगणित आहे. देशातील काही राज्ये श्रीमंत (India’s Richest State) आहेत, तर काही गरिब. प्रत्येक राज्यात तुम्हाला त्या राज्याचा समृद्ध आणि गौरवशाली इतिहास मिळेल. तर काही राज्यांमध्ये कमालीची गरिबी दिसेल. देशातील हे राज्य सर्वात धनवान आहे. भारताच्या श्रीमंतीचा राजमार्ग याच राज्यातून जातो. देशाच्या विकासात आणि श्रीमंतीत हेच राज्य सर्वाधिक भर घालत आहे. देशातील आर्थिक विकासात काही राज्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. त्यात या राज्यानं मोठी भूमिका बजावली आहे. कोणते आहे श्रीमंत राज्य ?

निवडीचे काय निकष भारताच्या कोणत्याही राज्याच्या श्रीमंतीचे काही निकष आहेत. ही विविध निकष आहेत. यामध्ये GSDP, प्रति व्यक्ती उत्पन्न, मानवी विकास निर्देशांक, गरीबीचा स्तर, रोजगार आणि बेरोजगारी इत्यादी. सकल राष्ट्रीय उत्पादनात राज्याचा वाटा किती आहे, हा पण एक निकष आहे. राज्यात एका निश्चित कालावधीत कोणत्या सेवा आणि उत्पादन होते हे पण तपासण्यात येते. हे निकष कोणत्या राज्याला आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी महत्वाचे आहेत.

महाराष्ट्र सर्वात श्रीमंत राज्य भारतातील सर्वात श्रीमंत राज्य अर्थातच महाराष्ट्र आहे. 400 दशलक्ष अमेरिकी डॉलर GSDP सह महाराष्ट्र भारतातील सर्वात श्रीमंत राज्य आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाते. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र देशातील तिसरे राज्य आहे. या ठिकाणी 45 टक्के लोकसंख्या शहरी भागात राहते. बॉलिवूड, अभिनेता, अभिनेत्री, मोठे उद्योजक, लोकप्रिय व्यक्ती मुंबईत राहतात.

हे सुद्धा वाचा

सोयाबीन, ऊसासह कापसाची मोठी बाजारपेठ देशातील सर्वात मोठे मेट्रो शहर मुंबई महाराष्ट्रात आहे. तसेच शिक्षणासाठी पुणे हे शहर प्रसिद्ध आहे. अनेक पर्यटनस्थळे आणि धार्मिकस्थळे याच राज्यात आहेत. चित्रपट उद्योग, अनेक मोठं मोठे उद्योग महाराष्ट्रातील अनेक एमआयडीसीमध्ये आहेत. देशाच्या विकासात या उद्योगांची भरीव मदत होते. कृषी क्षेत्राकडून पण मोठी मदत मिळते. सोयाबीन, ऊसासह कापसाचे मोठे उत्पादन महाराष्ट्रात होते.

गरिबीमध्ये यांचा क्रमांक पुढे देशातील ही पाच राज्य सर्वात गरीब आहेत. छत्तीसगड हे देशातील सर्वात गरीब राज्य आहे. या राज्यात गरिबीचा दर 37% आहे. या राज्यात अनेक लोक दारिद्रयरेषेखाली राहतात. दुसऱ्या क्रमांकावर झारखंड हे राज्य आहे. याठिकाणचा गरिबीचा दर 36.96 टक्के आहेत. त्यानंतर मणिपूर, अरुणाचल प्रदेश, बिहार यांचा क्रमांक लागतो. बिहारमध्ये विकास कामांना चालना मिळाली असली तरी हे प्रमाण कमीच आहे.

फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ.
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी.
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं...
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं....
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंचा प्रश्न
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंचा प्रश्न.