Tata Company : कर्जमुक्त होत आहे, टाटांची ही कंपनी, तज्ज्ञांनी दिला शेअर खरेदीचा सल्ला

Tata Company : टाटा समूहाची ही कंपनी लवकरच कर्जमुक्त होणार आहे. येत्या काही दिवसांत कंपनीचा तिमाही निकाल हाती येईल. तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक खरेदी करणे फायद्याचे गणित ठरु शकते. हा शेअर काही दिवसातच लांबचा पल्ला गाठेल.

Tata Company : कर्जमुक्त होत आहे, टाटांची ही कंपनी, तज्ज्ञांनी दिला शेअर खरेदीचा सल्ला
Follow us
| Updated on: May 04, 2023 | 12:08 PM

नवी दिल्ली : टाटा समूहाची कंपनी टाटा मोटर्सचे (Tata Motors Share) तिमाही निकाल लवकरच हाती येणार आहे. यावेळी कंपनी जोरदार कामगिरी करु शकते, असा अंदाज बांधण्यात येत आहे. आर्थिक वर्ष 2025 पर्यंत टाटा मोटर्स कर्जमुक्त होईल, असा अंदाज मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेज लिमिटेडने व्यक्त केला आहे. या ब्रोकरेज फर्मने हे शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक खरेदी करणे फायद्याचे गणित ठरु शकते. टाटा कंपनीवर गुंतवणूकदारांचा मोठा विश्वास आहे. हा शेअर काही दिवसातच लांबचा पल्ला गाठेल. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फायदा होईल.

नफ्याचे गणित जुळून येईल जागतिक स्तरावर टाटा मोटर्सचे तीनही व्यवसाय चांगली कामगिरी करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. भारतात कंपनी पुन्हा नफ्याच्या ट्रॅकवर येत आहे. या सर्व घडामोडींचा परिणाम कंपनीच्या शेअरवर दिसून येईल. त्यामुळे शेअर जोरात धावतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काही तज्ज्ञांनी टाटा मोटर्ससाठी 550 रुपयांचे लक्ष्य निश्चित केले आहे.

सध्या काय किंमत सध्या टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत 485 रुपये आहे. सध्या या शेअरमध्ये चढउतार दिसून येत आहे. शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 494.50 रुपये आहे. 17 ऑगस्ट 2022 रोजी शेअरने हा उच्चांक गाठला होता. या शेअरने गेल्या वर्षभरात दोन अंकी परतावा दिलेला नाही. एका वर्षांत या शेअरने 7.35 टक्के परतावा दिला आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षांत या शेअरने गुंतवणूकदारांना क्रमशः 25 टक्के आणि 85 टक्के परतावा दिला.

हे सुद्धा वाचा

12 मे रोजी येतील निकाल टाटा मोटर्सचे मार्च तिमाही निकाल या 12 मे रोजी येण्या्ची शक्यता आहे. गेल्या आर्थिक वर्षात डिसेंबर तिमाहीत कंपनीला 3043 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनी तोट्यात होती.

टाटा कंझ्युमर नफ्यात टाटा समूह मीठापासून ते विमान सेवेपर्यंत अनेक क्षेत्रात अग्रेसर आहे. अनेक जागतिक ब्रँड या समूहाने पंखाखाली घेतले आहे. या समूहाने मोठा विस्तार केला आहे. प्रत्येक प्रांतात, क्षेत्रात आपला ठसा उमटविण्याचा खास प्रयत्न टाटा समूह करतो. टाटा समूह चहा, कॉपी आणि मीठाच्या उत्पादनातून कोट्यवधींची कमाई करत आहे. टाटा कंझ्युमर प्रोडक्टसने कंपनीचे तिमाही निकाल जाहीर केले आहेत. यामध्ये कंपनीला 268 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. गेल्या वर्षात याच तिमाहीत कंपनीला 217 कोटींचे नुकसान झाले होते. त्यातुलनेत आता 23 अधिक नफा झाला.

गुंतवणूकदारांना फायदा चौथ्या तिमाहीत ऑपरेशनल रेव्हेन्यूमध्ये वार्षिक आधारावर 14 टक्क्यांचा नफा दिसून आला आणि हा आकडा 3,619 कोटी रुपयांवर पोहचला. एका वर्षाच्या समान कालावधीत हा आकडा 3,175 कोटी रुपये होता. बोर्डाने आर्थिक वर्ष 2022-23 साठी 8.45 रुपयांचा अंतिम लाभांश जाहीर केला. संचालक मंडळाच्या बैठकीनंतर 30 दिवसांच्या आत त्याचा फायदा मिळेल.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.