Share Market : पुढील आठवड्यात शेअर बाजाराची काय राहील दशा आणि दिशा, काय म्हणतात बाजारातील तज्ज्ञ?

Share Market : या आठवड्यात शेअर बाजाराची काय असेल चाल, होईल फायदा की सहन करावे लागेल नुकसान

Share Market : पुढील आठवड्यात शेअर बाजाराची काय राहील दशा आणि दिशा, काय म्हणतात बाजारातील तज्ज्ञ?
बाजाराचा रोख काय?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 18, 2022 | 8:52 PM

नवी दिल्ली : या आठवड्यात (Week) जागतिक घडामोडी (International Update) आणि विदेशी गुंतवणूकदार (FII) निर्णायक भूमिका वठवतील. त्यांच्या मूडवर शेअर बाजाराची (Share Market) घौडदौड ठरेल. हादरे देणाऱ्या बाजाराने गेल्या पंधरवाड्यात गुंतवणूकदारांना चांगले हादरवले आहे. त्यामुळे गुंतवणूकदार (Investors) वर्षांच्या शेवटच्या महिन्यात नुकसान सहन करण्याच्या मूडमध्ये तर नक्कीच नाही. हे वर्ष सरताना कमीत कमी नुकसान आणि जास्तीत जास्त फायदा ही आठवण ते पक्की करु इच्छितात.

स्वास्तिका इन्वेस्टमार्टचे प्रमुख संतोष मीणा यांच्या मते, या आठवड्यात बाजार वेगळे संकेत देत नाही. त्यामुळे बाजारात तेजी आणि मंदीचे सत्र कायम राहील. दोन्ही प्रवाहामुळे बाजार हिंदोळ्यावर राहील. अमेरिकन बाजारात सध्या विक्रीचे सत्र जोरात आहे. त्यामुळे त्याचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून येत आहे.

डिसेंबर महिन्यात FII ने जोरदार विक्री सत्र आरंभल्याचे परिणाम गेल्या पंधरवाड्यात गुंतवणूकदारांनी अनुभवले आहे.परदेशी गुंतवणूकदारांपेक्षा भारतीय गुंतवणूकदारांनी बाजार सावरण्याचा प्रयत्न केला आहे. हाच मूड या आठवड्यातही कायम राहण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडचे उपाध्यक्ष अजित मिश्रा यांच्या मते, बाजारात मोठी घडामोड होण्याचे संकेत दिसत नाही. पण अमेरिकन बाजारातील घडामोडींचा आणि धोरणांचा मोठा परिमाम भारतीय बाजारात दिसून येईल. बाजाराची दिशा त्यावर ठरेल.

युरोपियन मध्यवर्ती बँक (ECB) आणि बँक ऑफ इंग्लंड (BOE) या केंद्रीय बँकांच्या व्याजदरांची वृद्धी आणि आक्रमक धोरणांचा मोठा परिणाम दिसून येईल. या बँका अमेरिकन फेडरल रिझर्व्ह सारखी आक्रमक भूमिका घेऊ शकता. व्याजदर वाढवू शकतात. त्यामुळे जागतिक बाजारात पुन्हा मंदीची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या आठवड्यात निर्देशांकात 843.86 अंक वा 1.36 टक्के घसरला. तर निफ्टी 227.60 अंक अथवा 1.23 टक्के खाली आला. आता नाताळचे वेध लागल्याने विदेशी संस्थागत गुंतवणूकदार सुट्यांच्या मूडमध्ये आहे, त्यामुळे बाजारात संथपणे येण्याची शक्यता आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.