Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jaiguru Achar Harinder : ऐकावे ते नवलच! दुधामुळेच नाही तर गायीच्या शेणामुळे झाला करोडपती

Jaiguru Achar Harinder : अभियंत्याच्या नोकरीला रामराम ठोकून या तरुणाने स्वतःचा व्यवसाय सुरु केला. गायीच्या दुधापासून नाही तर शेणामुळे त्याने आतापर्यंत कोट्यवधी रुपये कमावले आहे.

Jaiguru Achar Harinder : ऐकावे ते नवलच! दुधामुळेच नाही तर गायीच्या शेणामुळे झाला करोडपती
Follow us
| Updated on: May 12, 2023 | 8:23 PM

नवी दिल्ली : मनाचा निश्चय पक्का असेल तर हुकमाचा एक्का व्हायला वेळ लागत नाही. कोणताच व्यवसाय छोटा-मोठा नसतो. छोट्या व्यवसायाला मेहनतीचं आणि कल्पकतेची जोड दिली तर तुम्हाला साम्राज्य तयार करायला वेळ लागत नाही. आजकाल नोकरीतील तोच तोचपणाला कंटाळून अनेक तरुण स्टार्टअपकडे (Start Up) वळले आहेत. मनासारखं काम करता येत असल्याने त्यांना आकाश ठेंगण झालं आहे. कर्नाटकातील या तरुणाने असेच मनाचे ऐकले आणि आज तो कमी वयात मोठा व्यावसायिक झाला आहे. अवघ्या 26 वर्षाच्या जयगुरु आचार हिंडरने (Jaiguru Achar Harinder) तरुणांसमोर आदर्श ठेवला आहे. तो एका खासगी कंपनीत सिव्हिल इंजिनिअर होता.

शेणापासून उत्पन्न जयगुरुने हटके काम केलं. दुधाचा व्यवसाय तर सगळेच करतात. त्यापासून बक्कळ कमाई पण करतात. पण जयगुरुने दुधा व्यतिरिक्त गायीच्या शेणावर लक्ष केंद्रीत केले. त्याच्या गायींसाठीच्या फार्मवर गायींना दररोज अंघोळ घालण्यात येते. हे पाणी पण जयगुरु आयडियाची कल्पना वापरुन विक्री करत आहे. या व्यवसायातून त्याला जोरदार नफा झाला आहे.

गावखेड्यात मोठा व्यवसाय जयगुरु आचार हिंडर दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तूर तालुक्यातील मुंडुरु गावातील रहिवाशी आहे. त्याने विवेकानंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी, पुत्तूर येथून पदवी मिळवली. त्यानंतर तो एका खासगी कंपनीत नोकरीला लागला. सर्वसामान्य मुलासारखंच त्याचं आयुष्य होतं. त्याला 22000 रुपये पगार होता. पण या कामात त्याचं काही मन रमेना. कोरोना काळात 2019 मध्ये त्याने या नोकरीला रामराम ठोकला. पण मनात असंख्य विचार होते. काहीतरी वेगळं करायचं हे विचारचक्र डोक्यात फिरत होते.

हे सुद्धा वाचा

युट्यूबने दिली आयडियाची कल्पना जयगुरुचे पूर्वीपासूनच शेतीत मन रमत होते. वडिलांना तो शेतात मदत करत होता. त्यांच्याकडे 10 गाई होत्या. त्याने शेतात प्रयोग केले. त्यासाठी तो युट्यूबवर अनेक व्हिडिओ बघत होता. त्याने पटियाला येथे जाण्याचा निर्णय घेतला. त्याने दूध डेअरी सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याने हळूहळू त्याच्या शेतात खास शेड केले आणि 130 गाई खरेदी केल्या. त्यानंतर पैसा येत गेला. नवीन कल्पना सूचत गेल्या. हा व्यवसाय वाढविण्यासाठी त्याने 10 एकर जमीन खरेदी केली.

शेणखताची आयडिया शेणखताविषयी त्याच्या मनात विचार घोळत होते. मग त्याला कल्पना सूचली. त्याने शेण पटकन वाळवून त्याचा भूगा करणारी मशीन खरेदी केली. दरमहिन्याला तो गायीच्या शेणाच्या 100 पोते विकतो. त्यामाध्यमातून त्याची जोरदार कमाई होते. एवढंच नाही तर गायीच्या शेणाचे इतर उपयोग लक्षात घेत त्याने त्याचे मार्केटिंग सुरु केले आहे. गाय आणि गोठा स्वच्छ केल्यानंतर ते पाणी एका ठिकाणी जमा करुन ते टँकरमध्ये भरण्यात येते. हे पाणी फळ बागायतदार आणि इतर शेतकरी खरेदी करतात.

इतकी कमाई जयगुरु प्रत्येक दिवशी 750 लिटर दूध आणि महिन्याला 30-40 लिटर तूप विक्री करतो. 10 एकर परिसरात त्याचे हा व्यवसाय चालतो. हा सर्व भाग अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कॅमेऱ्यांनी व्यापलेला आहे. दरमहिन्याला त्याला 10 लाखांची कमाई होते. आता जयगुरुने पुढील प्रकल्प हाती घेतला आहे. दुधाच्या पदार्थांचे उत्पादन करण्यात येणार आहे. तसेच गायीच्या शेणापासून इतर वस्तू तयार करण्याच्या प्रकल्पावर काम सुरु करण्यात येणार आहे.

हीच ती जागा जिथं पर्यटकांवर गोळ्या, अंगावर काटा येणारा व्हिडीओ पाहिला?
हीच ती जागा जिथं पर्यटकांवर गोळ्या, अंगावर काटा येणारा व्हिडीओ पाहिला?.
दहशतवाद्यांना भारताचं स्पिरिट कधीच मोडता येणार नाही - पंतप्रधान मोदी
दहशतवाद्यांना भारताचं स्पिरिट कधीच मोडता येणार नाही - पंतप्रधान मोदी.
प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?
प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?.
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने.
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन.
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव.
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर.
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव.
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव.