उद्योजकांची बदलली Dream City! दिल्ली-मुंबई नाही तर या शहराला पसंती
Hurun India List | Self Made Industrialist साठी हे शहर देशात सर्वोत्तम असल्याचे हुरुन इंडिया 2023, च्या यादीवरुन स्पष्ट झाले आहे. हुरून इंडिया टॉप 200 ही यादी जाहीर झाली आहे. यामध्ये स्वतःच्या मेहनतीवर उद्योजक झालेल्या 200 उद्योजकांची नावे समोर आली आहे. या यादीत डी-मार्टचे संस्थापक राधाकृष्ण दमानी हे पहिल्या क्रमांकावर आहेत.
नवी दिल्ली | 1 डिसेंबर 2023 : हुरून इंडिया टॉप 200 यादी आली आहे. यामध्ये देशातील 200 सेल्फ मेड उद्योजकांची नावे जाहीर करण्यात आली आहे. ज्यांनी स्वतःच्या हिंमतीवर 21 व्या शतकात मोठी मजल मारली आहे. त्यांनी उद्योगविश्वात स्वतःचा झेंडा फडकावला आहे, अशा दोनशे उद्योजकांचे कर्तृत्व यामुळे समोर आले आहे. या यादीत एक रोचक माहिती समोर आली आहे. त्यानुसार, आता उद्योजकांची पसंती बदलली आहे. ते दिल्ली-मुंबईपेक्षा या शहराच्या प्रेमात पडले आहे. त्यांनी हे शहर Dream City म्हणून निवडले आहे. दिल्ली-मुंबई मागे पडली आहे. अजून काय काय आहे हुरून इंडियाच्या यादीत?
या शहराला पसंती
हुरुन इंडियाच्या टॉप 200 लिस्टनुसार, पूर्वी दिल्ली आणि मुंबई हे उद्योजकांचे आवडते ठिकाण होते. दिल्ली देशाची राजधानी आहे. तर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. पण आता या शहरात स्वप्न साकारण्यापेक्षा नवउद्योजकांनी दक्षिणेत मोर्चा वळवला आहे. कर्नाटकची राजधानी बंगळुरु शहर हे उद्योजकांचे सर्वाधिक आवडते ठिकाण झाले आहे. हुरुण यादीत बेंगळुरुतील 129 उद्योजकांचा क्रमांक लागला आहे. तर त्या खालोखाल मुंबईतील 78 आणि दिल्ली-गुडगाव मिळून 49 उद्योजकांचा समावेश करण्यात आला आहे.
डी-मार्टचे संस्थापक यादीत पहिल्या क्रमांकावर
रिटेल चेन डी-मार्टचे (D Mart) संस्थापक राधाकृष्ण दमानी (Radhakishan Damani) या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 2.38 लाख कोटी रुपये आहे. त्यानंतर फ्लिपकार्टचे (Flipkart) बिन्नी बन्सल (Binny Bansal) आणि सचिन बन्सल (Sachin Bansal) यांचा क्रमांक लागतो. त्यांचे इक्विटी मूल्य 1.19 लाख कोटी रुपये आहे.
या वित्तीय संस्था अग्रेसर
या यादीत आयडीएफसी फर्स्ट बँकेने (IDFC First Bank) पहिला क्रमांक पटकावला आहे. यादीत एकूण 68 कंपन्यांचे 156 संस्थापकांनी बाजी मारली आहे. फायनेन्शिअल सर्व्हिसेजच्या 46 आणि रिटेल सेक्टरमधील 30 कंपन्यांनी या यादीत स्थान तयार केले आहे. या यादीत समावेश असलेल्या 34 टक्के कंपन्यांचा व्यापार जगभरात पसरला आहे.
टॉप-10 मध्ये 8 स्टार्टअप
या यादीतील दोनतृतीयांश संस्थापक 1990 च्या दशकात जन्म झालेले आहेत. यातील 108 मालक आणि 64 कंपन्यांनी हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 मध्ये पण त्यांचे स्थान पक्के केले होते. या यादीत त्यांचेच नाव आहे, ज्यांनी स्वतःच्या हिंमतीवर उद्योग उभा केला आहे. या टॉप-10 मध्ये 8 स्टार्टअप आहेत. त्यामध्ये Zerodha, Razorpay, Paytm Zomato यांचा क्रमांक लागतो. तरुण महिला उद्योजिकांमध्ये ममाअर्थची अलख आणि Winzo च्या सौम्या सिंह यांचा क्रमांक लागतो