Global Citizen | श्रीमंतांची देश सोडण्यासाठी रीघ..का चालले अब्जाधीश देश सोडून..

Global Citizen | एका ग्लोबल सर्व्हेनुसार या वर्षाच्या शेवटपर्यंत अनेक अब्जाधीश भारत सोडणार आहेत. पण यामागची कारणे काय आहेत?

Global Citizen | श्रीमंतांची देश सोडण्यासाठी रीघ..का चालले अब्जाधीश देश सोडून..
का सोडून चालले श्रीमंत देश?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 21, 2022 | 11:52 AM

नवी दिल्ली : श्रीमंत भारतीयांना (Richest Indians) प्यारा हिंदुस्थान सोडण्याची घाई झाली आहे. या वर्षाच्या शेवटपर्यंत अनेक अब्जाधीश भारत सोडण्याचा (Migration) दावा करण्यात येत आहे. Henley Global Citizen यांनी केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे.

आता या यादीत उद्योजकच नाही तर कॉर्पोरेट अधिकारी, नोकरशहा, मोठे अधिकारी यांचा समावेश आहे. पण भारतात आतापर्यंत विविध लाभ घेऊन कष्टाने श्रीमंत झालेला हा वर्ग अचानक देश सोडून जात असल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

आता तुम्ही म्हणाल जातील 50-100 माणसं तर काय मोठा फरक पडणार आहे.  तर थांबा.  कारण हा आकडा वाटतो तेवढा लहान नाही. तब्बल 8000 श्रीमंत भारतीय देशाला कायमचा रामराम ठोकण्याच्या मार्गावर असल्याचा दावा या सर्वेक्षणात करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

एकीकडे सर्वात वेगाने झेपवणारी अर्थव्यवस्था म्हणून डंका पिटवत असताना आणि कोरोनाला चारीमुंड्या चीत करणाऱ्या भारताला हा नव पलायनवाद एक धक्काच ठरू पाहत आहे. इतर देशांपेक्षा सोयी-सुविधाही चांगल्या मिळत असताना देशाबाहेर जाणाऱ्यांचा हा मोठा आकडा धक्कादायक आहे.

पासपोर्टचे कडक नियम आणि उद्योगांना मिळणाऱ्या कमी सवलती, इतर अन्य कारणांमुळे हे पलायन वाढले आहे. एक स्वस्त, सुरक्षित आणि नैसर्गिक वातावरणात मोठे अलिशान घर असावे अशा इच्छेतूनही देश सोडण्यात येत आहे.

काही श्रीमंत कर रचनेवर प्रचंड नाराज आहे. त्यांना देशात जादा कर द्यावा लागत आहे. कराचा बोजा उत्पन्नाचा मोठा भाग खाऊन टाकत असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे नाराजीमुळे ते देश सोडत आहे. कमी प्रदूषण असलेल्या देशात, निसर्गाच्या सान्निध्यात व्यापार उदीम वाढवण्यास वेळ मिळत असल्याने श्रीमंत भारतीय देश सोडण्याचा दावा करण्यात येत आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.