बिटकॉइनमध्ये मोठा घोटाळा; गुंतवणूकदारांच्या 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक गोत्यात; तुम्हीही सावध व्हा
धक्कादायक बाब म्हणजे ही कंपनी चालवणाऱ्या दोघा भावांपैकी एकाचाही कुठलाच थांगपत्ता लागलेला नाही. या कंपनीमध्ये सेलिब्रिटी गुंतवणूकदारांचा समावेश होता. (Three billion dollers big scam in Bitcoin; be careful about investment)
नवी दिल्ली : आजकाल बाजारात क्रिप्टोकरन्सीचा जलवा दिसत आहे. याचदरम्यान एक हैराण करणारे प्रकरण समोर आले आहे. दक्षिण आफ्रिकेतील क्रिप्टोकरन्सी गुंतवणूक फर्म आफ्रीक्रिप्ट ग्लोबलची तपासणी सुरू झाली आहे. आफ्रीक्रिप्ट ही कंपनी रायस काझी आणि अमीर काझी हे सीईओ असलेले दोन भाऊ चालवत होते. कंपनीमधून बिटकॉईन 6.6 अब्ज डॉलर्सचा बिटकॉइन (ज्याची किंमत साधारण 26,700 कोटी रुपये आहे) गायब झाला आहे. 25 जूनच्या दुपारी 3 वाजून 16 मिनिटांनी भारतात एका बिटकॉइनची किंमत 25.51 लाख रुपये इतकी होती. (Three billion dollers big scam in Bitcoin; be careful about investment)
काझी बंधू अद्याप फरार
यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे ही कंपनी चालवणाऱ्या दोघा भावांपैकी एकाचाही कुठलाच थांगपत्ता लागलेला नाही. या कंपनीमध्ये सेलिब्रिटी गुंतवणूकदारांचा समावेश होता. हे सगळे दोन महिन्यांपूर्वी सुरू झाले होते. त्यावेळी काझी बंधूंनी दावा केला होता की कंपनी हॅक झाली आहे. याच कारणावरून कंपनीचे कामकाज थांबविणे भाग पडले, असेही काझी बंधूंनी त्यावेळी जाहीर केले होते. त्यानंतर काझी बंधूंनी याबाबत पोलिसांना काहीच कळू न देण्याच्या सूचना क्रिप्टोकरन्सी गुंतवणूकदारांना केल्या. कारण असे केल्याने कंपनीच्या चोरीच्या 3.6 अब्ज डॉलर्सच्या डिजिटल नाण्यांची वसुली धोक्यात सापडू शकेल, अशी भीती काझी बंधूंना होती. सध्याच्या घडीला कंपनीची वेबसाइटदेखील कार्यरत नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. काझी बंधू नेमके कुठे गायब झाले आहेत, याबाबत गुंतवणूकदार विविध तर्कवितर्क लढवत आहेत.
सुरवातीला कंपनीकडून चांगला परतावा
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, काझी बंधूंना व्हॉईसमेलद्वारे कॉल्स फॉरवर्ड केले जात आहेत. काझी बंधूंच्या संशयास्पद कारभाराच्या हालचाली लक्षात आल्यानंतर सुमारे 20 गुंतवणूकदारांच्या गटाने कायदेशीर संस्थेची मदत घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेतील न्यायालयाने दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या कंपनीला तात्पुरते लिक्विड करण्याचे आदेश दिले आहेत. या कंपनीने सुरुवातीला खूप चांगला परतावा दिला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदार या कंपनीकडे आकर्षित झाले होते.
काझी बंधूंच्या बहिणीची चौकशी सुरु
काझी बंधूंची चुलत बहीण आणि आफ्रिक्रीप्ट येथे माजी सहाय्यक संचालक राहिलेली झकीरा लाहर यांना चौकशीला तोंड द्यावे लागत आहे. मीडिया आणि पोलिसांबरोबरच गुंतवणूकदारांचे अनेक फोन कॉल्स लाहर यांना जात आहेत. भावांच्या संशयास्पद कारभारावर त्यांना उत्तर द्यावे लागत आहे. कंपनीतील सूत्रांच्या मते, लाहर यांना त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेची भीती वाटत आहे. त्यांच्या कुटंबात एका आठवड्याच्या मुलाचाही समावेश आहे. आफ्रिक्रीप्ट कंपनीच्या माध्यमातून आपण काहीच पैसे कमावले नाही, असा दावा लाहर यांनी केला आहे.
दरम्यान, हा किती मोठा घोटाळा आहे, याबद्दल दक्षिण आफ्रिकेच्या वित्त क्षेत्राशी संबंधित प्राधिकरण योग्य ती चौकशी करीत आहे. सध्या चौकशी पथकलाही कायदेशीर अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. (Three billion dollers big scam in Bitcoin; be careful about investment)
ओबीसी आरक्षणासाठी मुलुंड टोल नाक्यावर भाजपकडून चक्का जाम, आशिष शेलार पोलिसांच्या ताब्यात#OBCReservation #OBC #OBCआंदोलन #AshishShelar #BJP https://t.co/s1y6Xjad82
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 26, 2021
इतर बातम्या
500 रुपयांच्या नोटीबाबत शासनाची मोठी माहिती; जाणून घ्या काय ते