Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Money Making Tips : कमी वयात जास्त पैसे कमवायचे? मग ‘या’ तीन टिप्स नक्की वाचा

आधीच पैशांची चणचण त्यात गुंतवणूक केल्या हातात कमी पैसे उरतील यामुळे अनेकजण गुंतवणूक करण्यास कानाडोळा करतात. (make more money at a young age)

Money Making Tips : कमी वयात जास्त पैसे कमवायचे? मग 'या' तीन टिप्स नक्की वाचा
Follow us
| Updated on: May 24, 2021 | 3:36 PM

मुंबई : कोरोना कालावधीत अर्थव्यवस्थेसह अनेकांची आर्थिक परिस्थितीही बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला पैशांच्या गुंतवणुकीचा (Money investing tips) सल्ला दिला तर अनेकांना ते शक्य होत नाही. आधीच पैशांची चणचण त्यात गुंतवणूक केल्या हातात कमी पैसे उरतील यामुळे अनेकजण गुंतवणूक करण्यास कानाडोळा करतात. पण तुम्हाला शक्य असेल तितक्या लवकर गुंतवणूक करण्यास प्राधान्य द्यावे, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. (Three Tips for make more money at a young age)

पण गुंतवणूक म्हणजे बँकेच्या खात्यात पैसे वाचवले म्हणजे ती गुंतवणूक (money saving tips) ठरत नाही. यासाठी थोडशी माहिती घेऊन करुन तुम्ही सर्वोत्कृष्ट बचत योजना निवडू शकता. पण पैशांची बचत कशी करता येईल, यासाठी या टीप्स तुम्हाला नक्की उपयोगी पडू शकतात.

1. लवकरात लवकर कर्ज फेडा

जास्तीत जास्त पैसे बचत करण्यासाठी सर्वात प्रथम तुमच्या अंगावर असलेले कर्ज फेडा. नोकरीच्या सुरुवातीच्या काळात तुमचे कर्ज कमी असते. जर तुमच्या पालकांनी शिक्षणासाठी कर्ज घेतले असेल तर सर्वप्रथम ते कर्ज फेडा. यामुळे सततचा व्याजचा पैसा वाचेल. तसेच तुमच्यावरची मोठी जबाबदारी कमी होईल. त्यानंतर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करु शकता.

2. गुंतवणूकीत टाळाटाळ करु नका, कमी पैसे गुंतवा

अनेकदा लोक पैशांचा विचार करुन गुंतवणूक पुढे ढकलतात. पगार कमी आहे, खर्च जास्त आहे, अशी कारण देऊन नंतर गुंतवणूक करु असे सांगतात. मात्र जरी यात तथ्य असेल तरीही तुम्ही कमी पैशांची गुंतवणूक करा. ती करण्यास टाळाटाळ करु नका. जर तुम्हाला हवी असेल, तर तुम्ही 100 रुपयांपासून 500 रुपयांच्या SIP च्या म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणूक करु शकता. जर तुमच्याकडे शेअर बाजाराचे चांगले ज्ञान असेल तर तुम्ही थेट शेअर बाजारात गुंतवणूक करु शकता. जेणेकरुन तुम्हाला पैसे गुंतवण्याची सवय होईल.

3. योग्य माहिती घेऊन गुंतवणूक करा

एखाद्या शेअरने दोन महिन्यात 200 टक्के परतावा दिला किंवा एखादा स्टॉक दोन महिन्यात दुप्पट झाला, अशा अनेक बातम्या आपण ऐकतो. मात्र ऐकलेल्या माहितीवर विश्वास ठेवण्यापासून थोडी माहिती घेऊन गुंतवणूक करा. जर तुमच्याकडे शेअर बाजाराची माहिती नसेल तर तुमचे पैसे गमावू शकता. एखाद्या शेअरने इतके चांगले उत्पन्न कसे मिळवून दिले? त्यामागचे नेमकं कारण काय? याची माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला नुकसान होऊ शकते.

(Three Tips for make more money at a young age)

संबंधित बातम्या : 

FD, RD की NPS, गुंतवणुकीसाठीचा योग्य पर्याय कोणता? अधिक परतावा देणारी योजना कोणती?

इन्कम टॅक्सची कामं 31 मे पूर्वी करुन घ्या, जूनमध्ये काही दिवस वेबसाईट बंद राहणार, नेमकं कारण काय?

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.