धीरुभाई अंबानींच्या एका चुकीमुळे भावाला भाऊ वैरी झाले, ती चूक होती कोणती..?

धीरूभाई हे सर्वात दूरदर्शी आणि काळाच्या पुढे गेलेले होते. मात्र, मृत्यूपूर्वी त्यांनी मोठी चूक केली होती.

धीरुभाई अंबानींच्या एका चुकीमुळे भावाला भाऊ वैरी झाले, ती चूक होती कोणती..?
Follow us
| Updated on: Nov 08, 2022 | 4:44 PM

नवी दिल्लीः रिलायन्स उद्योग समुहाचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्याकडून नातेसंबंध फार प्रेमाने आणि आपुलकीने जपले जात होते. अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या वाईट दिवसात त्यांना केलेली मदत कुणापासून कधीच लपून राहिली नाही. व्यवसायाच्या गल्ल्यांपासून ते राजकारणाच्या पायऱ्यांपर्यंत त्यांनी आपल्या नातेसंबंधातून नात्यांचा लगाम कधीच ढळू दिला नाही. धीरूभाई हे सर्वात दूरदर्शी आणि काळाच्या पुढे गेलेले होते. मात्र, मृत्यूपूर्वी त्यांनी मोठी चूक केली होती. आपल्या हयातीत त्यांनी आपल्या मुलांच्या नावे मृत्यूपत्र केले नाही. त्यामुळे मुकेश अंबानी आणि अनिल यांच्यातील संबंध दुरावण्याचे ते एक महत्वाचे कारण होते.

कदाचित धीरूभाईं अंबानी यांना मुकेश आणि अनिल ज्याप्रकारे एकमेकांवर जीव ओवाळून टाकतात त्यांच्यावरुन त्यांच्या उद्योगाला अशी परिस्थिती येईल असं त्यांना कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं असेल.

मात्र, 2002 मध्ये त्यांचे निधन होताच, दोन्ही भावा भावामध्ये वर्चस्ववादाचे युद्ध सुरु झाले. त्यामुळेच 2005 मध्ये रिलायन्स समूहाचे विभाजन होऊन सगळ्या गोष्टी शांत झाल्या. मात्र, तोपर्यंत दोन्ही भावांमध्ये मात्र तणाव निर्माण झाला होता.

मृत्युपत्र बनवणे हा आर्थिक नियोजनाचा महत्त्वाचा भाग मानला जातो, कारण यामुळे नंतर भांडण होण्याची शक्यता नाहीशी होते.

त्यामुळे कायदेशीर त्रास आणि कौटुंबिक वादही होत नाहीत. पण, याबाबती मात्र धीरूभाई अंबानी चुकले होते असच म्हटले जाते. पुत्रांच्या परस्पर प्रेमावर त्यांचा इतका विश्वास होता की त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

धीरूभाई जिवंत असेपर्यंत मुकेश आणि अनिल यांचे काम पूर्णपणे वेगळे होते. रिलायन्सचे विभाजन होण्यापूर्वी धीरूभाईंचा धाकटा मुलगा म्हणजेच अनिल अंबानी हा कंपनीचा चेहरामोहरा होता.

जगभरातून कंपनीच्या मेगा प्रोजेक्टसाठी निधी उभारण्याची जबाबदारीही त्याच्यावरच होती. त्याबरोबरच अनिल अंबानी यांचा राजकारणापासून ते मीडिया आणि बँकांपर्यंत जबरदस्त संपर्कही होता. त्यामुळेच ते कंपनीसाठी लागणारे अर्थसहायय काही वेळात उभा करत होते.

दुसरीकडे, धीरूभाई आणि मुकेश यांचे लक्ष रिलायन्सचे साम्राज्य वाढवण्यावर होते. त्यामुळे कामाच्या जबाबदाऱ्या आणि योग्य विभागणी केली गेली होती. या सर्व प्रवासात त्यांना कधीच कुठे अडथळा जाणवला नाही. त्यानंतरच्या काळात दोघा मुलांची लग्नही झाली.

मुकेशचे लग्न नीता यांच्याबरोबर झाले त्यामुळे अनिलने त्या काळातील प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री टीना मुनीमसोबत लग्न केले. मात्र, टीना आणि अनिल यांच्या बॉलीवूडमध्ये काम केल्यामुळे त्यांच्या लग्नावर कुटुंबीयांचा आक्षेप होता.

अनिलने टीनासोबत लग्न करावे असे कुटुंबीयांना वाटत नव्हते. मात्र, इच्छा नसतानाही टीना अंबानी कुटुंबाचा एक भाग बनली.

त्याचबरोबर टीना आणि नीता यांच्यामध्ये मतभेद असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र धीरूभाई राहेपर्यंत कौटुंबिक मतभेद कधीच उघड झाले नाहीत. असे म्हणता येईल की सर्वकाही नियंत्रणात होते.

2002 मध्ये जेव्हा मुलांच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र दूर झाले त्यावेळी इच्छापत्र न ठेवताच धीरूभाई हे जग सोडून गेले होते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरातील वादाप्रमाणेच अंबानी यांच्या कुटुंबीयातील वाद उफाळून आले.दोन भावांमध्ये उद्योगासाठीचा संघर्षही सुरू झाला. रिलायन्स ताब्यात घेण्यासाठी मुकेश आणि अनिल यांच्यात युद्ध सुरू झाले.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.