‘टाईगर अभी जिंदा है’!; आता कोणते वादळ आणणार जगातील पहिली CNG Bike तयार करणारे राजीव बजाज

Rajiv Bajaj : बजाज ऑटो कंपनीने जगातील पहिली सीएनजी बाईक नुकतीच बाजारात आणली आहे. तिची जगभरात चर्चा आहे. त्याचवेळी राजीव बजाज यांचे एक वक्तव्य खूपच व्हायरल झाले आहे. 'टाईगर अभी जिंदा है'! या वक्तव्याची सोशल मीडियावर एकच चर्चा आहे.

'टाईगर अभी जिंदा है'!; आता कोणते वादळ आणणार जगातील पहिली CNG Bike तयार करणारे राजीव बजाज
टाईगर अभी जिंदा है
Follow us
| Updated on: Jul 11, 2024 | 11:10 AM

दुचाकी बाजारात बजाज ऑटो, टीव्हीएस आणि हिरो समूहाचा दीर्घकाळापासून दबदबा आहे. या तीनही कंपन्या बाजारात एकमेकांच्या प्रतिस्पर्धी आहेत. जगातील पहिली सीएनजी बाईक उतरवून बजाज ऑटोने हवा केली आहे. त्यांच्या या बाईकची दखल जागतिक पातळीवरील अनेक कंपन्यांनी घेतली आहे. या बाईकच्या लाँचिंगवेळी बजाज ऑटोचे प्रमुख राजीव बजाज यांनी हिरो समूहाविषयी एक मोठा किस्सा सांगितला. सोबतच ‘टाईगर अभी जिंदा है’ हे वक्तव्य केले. ते उद्योगविश्वच नाही तर तरुणांमध्ये पण लोकप्रिय झाले आहे. काय आहे तो किस्सा?

Bajaj CNG Freedom

जगातील पहिली सीएनजी बाईक Bajaj Freedom 125 मध्ये कंपनीने 125 सीसी क्षमतेचे पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन बाईकला 9.5PS ची पॉवर आणि 9.7Nm चा टॉर्क जनरेट करते. यामध्ये कंपनीने 2 लिटरचे पेट्रोल फ्युएल टँक आणि 2 किलोग्रॅमची सीएनजी टँक दिली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, बाईक फुल टँकमध्ये (पेट्रोल+सीएनजी) 330 किमीपर्यंतचे अंतर कापते. सध्या या बाईकची किंमत 95,000 रुपयांच्या घरात आहे.

हे सुद्धा वाचा

का म्हणाले ‘टाइगर अभी जिंदा है’

राजीव बजाज यांनी हिरो मोटर्सविषयीचा एका किस्सा सांगितला. 1990 मध्ये बजाज चेतकचे मार्केट डाऊन झाले. या स्कूटरची विक्री घसरली. त्याची जागा मोटरसायकलने घेतली. स्कूटरच्या तुलनेत मोटरसायकलचे मायलेज जास्त असल्याने बाजारात दुचाकींचा दबदबा वाढला. 1997 मध्ये पहिल्यांदा असे झाले की हिरो होंडाच्या विक्रीचे आकडे बजाजपेक्षा जास्त होते.

त्यावेळी हिरो होंडाचे चेअरमन बृजमोहन लाल (मुंजाल) हे होते. त्यांनी हिरोची विक्री बजाज पेक्षा अधिक झाल्यावर कर्मचाऱ्यांना बोलावले. टायगर (बजाज) आता जखमी झाला आहे, तेव्हा थोडं लक्ष ठेवा, असा सल्ला दिला. सीएनजी बाईक लाँच करताना जवळपास 30 वर्षांनी आता आम्ही (बजाज) हिरोला दाखवून दिले आहे की, ‘टाइगर अभी जिंदा है’. आता आम्ही बाजारात मुसंडी मारणार आहोत, जणू असेच बजाज यांना सुचवायचे तर नसेल ना…

सीएनजी बाईकचे अर्थकारण

राजीव बजाज यांनी सीएनजी बाईकचे अर्थकारण समजावून सांगितले. 1990 च्या दशकात स्कूटरची विक्री घसरली. त्यामागे सर्वात मोठे कारण होते. इंधनाच्या वाढलेल्या किंमत आणि त्यात स्कूटर जवळपास 40 किमीचे मायलेज देत होती. त्याचवेळी दुचाकी आल्या. त्यांनी मायलेज 60 ते 80 किमीपर्यंत वाढवले. त्यामुळे सहाजिकच ग्राहकांच्या खिशावरील ताण कमी झाला. आता जवळपास 30 वर्षानंतर पुन्हा इंधनाच्या गगनभरारीमुळे सर्वसामान्य वैतागला आहे आणि सीएनजी बाईकने मायलेज 330 किमी करण्याचे काम केल्याची पुश्ती बजाज यांनी जोडली.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.