Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parineeti Raghav Net Worth : आज दोघांच्या नात्यात साखर पेरणी! राघव चड्डा आणि परिणीती चोप्राची जाणून घ्या संपत्ती

Parineeti Raghav Net Worth : राज्यसभेतील खासदार राघव चड्ढा अभिनेत्री परिणीती चोप्रा हिच्यासोबत साखरपुडा करत आहेत. हे दोघे पण इतक्या संपत्तीचे मालक आहेत.

Parineeti Raghav Net Worth : आज दोघांच्या नात्यात साखर पेरणी! राघव चड्डा आणि परिणीती चोप्राची जाणून घ्या संपत्ती
Follow us
| Updated on: May 13, 2023 | 10:10 AM

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे (AAP)  नेते आणि राज्यसभेचे सदस्य राघव चड्ढा (Raghav Chadha) आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) यांचा साखरपुडा होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. या दोघांच्या नात्यात साखर पेरणी होत आहे. अर्थात या विषयी दोघांनी पण अधिकृत कोणती ही घोषणा केली नाही. पण त्यांच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींना हे दोघे लवकरच एकत्र येतील अशी आशा आहे. दोघेही त्यांच्या आयुष्यात यशस्वी आहेत. राघव राजकारणात तर परिणीतीने बॉलिवूडमध्ये स्वतःला सिद्ध केले आहे. या यशासोबतच दोघांकडे गडगंज संपत्ती आहे. हे दोघे इतक्या संपत्तीचे मालक आहेत.

सर्वात तरुण सदस्य राघव चड्ढा हे राज्यसभेतील सर्वात तरुण सदस्य आहेत. गेल्या वर्षी राघव चड्ढा राज्यसभेचे सदस्य झाले. 2012 साली त्यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला आणि त्यांच्या राजकीय करिअरची सुरुवात झाली. 11 नोव्हेंबर 1988 साली राघव चड्ढा यांचा जन्म झाला. त्यांच्या जोरदार भाषणांमुळे त्यांनी तरुणाईचे मन जिंकले. राजकीय पक्षात सहभागी होण्यापूर्वी ते पेशाने चार्टड अकाऊंटंट होते. त्यांनी अनेक दिग्गज कंपन्यांमध्ये काम केले आहे. राघव चड्ढा यांची एकूण संपत्ती जवळपास 50 लाख रुपयांच्या घरात असल्याचे बोलले जाते.

राघव चड्ढाची इतकी संपत्ती राघव चड्ढा यांनी त्यांच्या निवडणूक शपथपत्रात संपत्तीची माहिती दिली आहे. त्यांच्याकडे एक मारुती स्विफ्ट डिझायर कार आहे. याशिवाय त्यांच्याकडे 37 लाख रुपयांचे घर आहे. 90 ग्रॅम सोने, ज्याची किंमत 5 लाख रुपये आहे. त्यांच्याकडे 52,839 रुपयांची जीवन विमा पॉलिसी आहे. त्यांच्याकडे बँकेत एकूण 14,57,806 रुपये ठेव असून त्यांच्याकडे त्यावेळी 30 हजार रुपये रोख आहे. तसेच त्यांनी बाँड, डिबेंचर, शेअरमध्ये एकूण 6 लाख 35 हजार रुपये गुंतवणूक केली आहे.

हे सुद्धा वाचा

परिणीती चोप्राकडील संपत्ती राघव चड्ढापेक्षा परिणीती चोप्राकडे अधिक संपत्ती आहे. परिणीतीचे शिक्षण लंडन येथील स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये झाले आहे. सियासेट रिपोर्टनुसार, परिणीतीकडे एकूण 60 कोटी रुपयांची संपत्ती आहे. चित्रपटातून होणारी कमाई, जाहिरात हे तिच्या उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. तिचे मुंबईत समुद्र किनारी एक आलिशान अपार्टमेंट आहे. तिच्याकडे ऑडी A6, जगुआर एक्सजेएल आणि ऑडी Q5 अशा कार आहेत. दोघेही त्यांच्या आयुष्यात यशस्वी आहेत. राघव राजकारणात तर परिणीतीने बॉलिवूडमध्ये स्वतःला सिद्ध केले आहे. राघव आणि परिणीती गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असून ते अनेकदा एकत्र दिसल्याने दोघांच्या लग्नाची चर्चा जोरात आहे.

खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.