Today gold, silver rates : सोन्याच्या किमतीत किंचित वाढ; चांदीचे भाव घसरले, जाणून घ्या आपल्या शहरातील दर

आज सोन्याच्या दरात (gold rate) किंचित वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बुधवारी 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 46,400 इतके होते. तर आज गुरुवारी 22 कॅरट सोन्याचे (gold) दर प्रति तोळा 46,410 इतके झाले आहेत.

Today gold, silver rates : सोन्याच्या किमतीत किंचित वाढ; चांदीचे भाव घसरले, जाणून घ्या आपल्या शहरातील दर
काय आहेत आज सोन्याचे भाव Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 12:05 PM

मुंबई : आज सोन्याच्या दरात (gold rate) किंचित वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बुधवारी 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 46,400 इतके होते. तर आज गुरुवारी 22 कॅरट सोन्याचे (gold) दर प्रति तोळा 46,410 इतके झाले आहेत. तर 24 कॅरट सोन्याच्या दरात देखील तोळ्यामागे अवघ्या दहा रुपयांची वाढ झाली आहे. बुधवारी 24 कॅरट सोन्याचा दर हा प्रति तोळा 50,620 इतका होता, तर आज गुरुवारी 24 कॅरट सोन्याचा भाव 50,630 रुपयांवर पोहोचला आहे. दुसरीकडे चांदी मात्र स्वस्त झाली आहे. चांदीच्या दरात (silver rate) मोठी घसरण पहायला मिळत आहे. बुधवारी चांदीचे दर प्रति किलो 55,900 रुपये इतके होते. आज चांदीचे दर घसरून प्रति किलो 55,600 रुपये इतके झाले आहेत. याचाच अर्थ आज चांदीच्या दरात किलो मागे तीनशे रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर दिवसातून दोनदा जारी केले जातात. एक सकाळी सराफा मार्केट सुरू होताच. तर दुसऱ्यांदा सायंकाळच्या सुमारास त्यामुळे सोन्याच्या दरात शहारानुसार तफावत आढळून येते.

राज्याच्या प्रमुख शहरातील सोन्याचे भाव

गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज राजधानी मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46410 रुपये इतका आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 50630 एवढा आहे. पुण्यात 22 कॅरट सोन्याचा भाव प्रति तोळा 46490 इतका असून, 24 कॅरट सोन्याचा रेट प्रति तोळा 50710 रुपये इतका आहे. उपराजधानी नागपूरमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46490 एवढा आहे, तर 24 कॅरट सोन्याचा भाव प्रति तोळा 50710 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46490 तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 50710 रुपये इतका आहे.औरंगाबादमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46450 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचा भाव प्रति तोळा 50700 इतका आहे.

प्रमुख महानगरातील दर

  1. राजधानी दिल्लीमध्ये आज 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46,410 रुपये इतका आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 50,630 रुपये इतका आहे.
  2. चेन्नईमध्ये 22 कॅरट सोन्याचा भाव प्रति तोळा 46,680 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचा रेट प्रति तोळा 50,930 रुपये इतका आहे.
  3. हे सुद्धा वाचा
  4. मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा रेट प्रति तोळा 46410 रुपये इतका असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 50630 एवढा आहे.
  5. कोलकातामध्ये 22 कॅरट सोन्याचा भाव प्रति तोळा 46410 रुपये आहे, तर 24 कॅरट सोन्याचा भाव प्रति तोळा 50630 रुपये इतका आहे.
  6. आज चांदीचे दर घसरले असून, चांदीचा दर प्रति किलो 55,600 रुपये एवढा आहे.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.