Today Petrol, Diesel Rate : सीएनजीच्या दरात मोठी वाढ; पेट्रोल, डिझेलची काय स्थिती?, जाणून घ्या नवे दर

Petrol, Diesel Rate देशातील प्रमुख पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. जाणून घेऊयात आजचे पेट्रोल, डिझेलचे दर

Today Petrol, Diesel Rate : सीएनजीच्या दरात मोठी वाढ; पेट्रोल, डिझेलची काय स्थिती?, जाणून घ्या नवे दर
पेट्रोल Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 9:17 AM

मुंबई : देशातील प्रमुख पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात (Petrol, Diesel Rate) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून राज्यात पेट्रोल (Petrol), डिझेलचे (Diesel) दर स्थिर आहेत. 21 मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोलच्या एक्साईज ड्यूटीमध्ये कपातीची घोषणा केली होती. त्यानंतर 22 मे रोजी पेट्रोल साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सहा रुपये प्रति लिटरने स्वस्त झाले. तेव्हापासून पेट्रोल, डिझेलेच दर स्थिर आहेत. राशिया, युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले होते, तेव्हा देखील पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. तर आता कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. घसरणीनंतर कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 100 डॉलरवर पोहोचले आहेत. तरी देखील देशात इंधनाचे दर कमी न करता स्थिरच ठेवण्यात आले आहेत. जाणून घेऊयात देशासह राज्यातील प्रमुख शहरांमधील इंधनाचे दर

देशाच्या प्रमुख महानगरातील दर

पेट्रोलियम कंपन्यांकडून आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर 96.72 रुपये एवढा आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये इतका आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.35 रुपये असून, डिझेलचा भाव प्रति लिटर 94.28 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 94.24 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.03 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 92.76 रुपये इतका आहे.

हे सुद्धा वाचा

राज्याच्या प्रमुख शहरातील इंधनाचे दर

शहरंपेट्रोलडिझेल
मुंबई106.3594.28
पुणे106.1092.58
नाशिक106.2292.70
नागपूर106.6593.14
कोल्हापूर106.0292.54

सीएनजी महागला

एकीकडे देशात गेल्या दोन महिन्यांपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र दुसरीकडे सीएनजी, पीएनजीच्या दरात वाढ सुरूच आहे. आज पुन्हा एकदा मुंबईत सीएनजीच्या दरात प्रति किलो सहा रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर पीएनजी देखील चार रुपयांनी महागला आहे. वाढत असलेल्या या महागाईचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसताना दिसून येत आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.