Today Petrol Diesel Rate: पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या आजचे पेट्रोल, डिझेलचे भाव

Petrol Diesel Rate पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. जाणून घेऊयात आजचे पेट्रोल, डिझेलचे भाव

Today Petrol Diesel Rate: पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या आजचे पेट्रोल, डिझेलचे भाव
पेट्रोल Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 04, 2022 | 9:08 AM

मुंबई : देशातील प्रमुख पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात (Petrol Diesel Rate) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या सत्तर दिवसांपासून देशात पेट्रोल (Petrol), डिझेलचे (Diesel) दर स्थिर आहेत. गेल्या 21 मे रोजी केंद्र सरकारने एक्साईज ड्यूटीमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला होता. पेट्रोल, डिझेलवरील एक्साईज ड्यूटीमध्ये कपात करण्यात आल्याने 22 मे रोजी पेट्रोल साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सहा रुपयांनी स्वस्त झाले होते. त्यानंतर इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कच्च्या तेलाचे दर जेव्हा जास्त होते तेव्हा देखील पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर होत्या, आता कच्च्या तेलाचे दर कमी झाले आहेत, मात्र पेट्रोल, डिझेलच्या भावात कोणतीही कपात करण्यात आली नसून भाव स्थिर आहेत.

प्रमुख महानगरातील पेट्रोल, डिझेलचे दर

पेट्रोलियम कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये इतका आहे.आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोल, डिझेलचा दर अनुक्रमे 106.35 व 94.28 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.24 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.03 तर डिझेलचा भाव प्रति लिटर 92.76 रुपये एवढा आहे.प्रमुख महानगरातील पेट्रोल, डिझेलच्या भावाची तुलना करायची झाल्यास सर्वात स्वस्त पेट्रोल, डिझेल मुंबईमध्ये आहे तर सर्वात महाग पेट्रोल, डिझेल हे अजूनही मुंबईमध्येच आहे.

हे सुद्धा वाचा

राज्याच्या प्रमुख शहरातील भाव

शहरंपेट्रोलडिझेल
मुंबई106.3594.28
पुणे106.1092.58
नाशिक106.2292.70
नागपूर106.6593.14
कोल्हापूर106.0292.54

सीएनजीच्या दरात वाढ सुरूच

देशात गेल्या सत्तार दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र दुसरीकडे सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ सुरूच आहे. याचा मोठा फटका हा सामान्य नागरिकांना बसत आहे. वाहतूक खर्चात देखील वाढ झाली आहे. बुधवारी मुंबईत सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा प्रति किलोमागे सहा रुपयांची वाढ करण्यता आली आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.