Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Today petrol, diesel rate : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; पुन्हा पेट्रोल, डिझेल महागणार?, जाणून घ्या आजचे दर

पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर (Petrol Diesel Price) जारी करण्यात आले आहेत. जाणून घेऊयात देशासह राज्याच्या प्रमुख शहारातील पेट्रोल, डिझेलचे रेट

Today petrol, diesel rate : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; पुन्हा पेट्रोल, डिझेल महागणार?, जाणून घ्या आजचे दर
पेट्रोल, डिझेल दर Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 10, 2022 | 8:44 AM

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, देशात पेट्रोल, डिझेलचे दर (Petrol Diesel Price) स्थिर आहेत. आज सलग 50 व्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. 21 मे रोजी पेट्रोल, डिझेलवरील एक्साईज ड्यूटीमध्ये कपातीची घोषणा केंद्राकडून करण्यात आली होती. त्यानंतर 22 मे रोजी पेट्रोल (Petrol) प्रति लिटर साडेनऊ रुपयांनी तर डिझेल (Diesel)सात रुपयांनी स्वस्त झाले. तेव्हापासून ते आजपर्यंत पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. एकीकडे कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार सुरूच आहे. मात्र दुसरीकडे पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आल्याने त्याचा मोठा फटका हा पेट्रोलियम कंपन्यांना बसत आहे. मार्जीनमध्ये मोठी घट झाली आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी देखील पेट्रोलपंपाना करण्यात येणारा इंधनाचा पुरववठा कमी केला आहे.

देशाच्या प्रमुख महानगरातील भाव

पेट्रोलियम कंपन्यांनी आज जारी केलेल्या नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर 96.72 रुपये तर डिझेल प्रति लिटर 89.62 रुपये इतके आहे. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये एवढा आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 रुपये आणि डिझेलचा रेट 94.24 इतका आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर 106.03 रुपये असून, डिझेलचा भाव प्रति लिटर 92.76 रुपये इतका आहे. महानगरातील पेट्रोल, डिझेलच्या भावाची तुलना करायची झाल्यास सर्वात स्वस्त पेट्रोल, डिझेल हे दिल्लीमध्ये तर सर्वात महाग इंधन मुंबईमध्ये आहे.

हे सुद्धा वाचा

राज्याच्या प्रमुख शहरातील दर

शहरंपेट्रोलडिझेल
मुंबई111.3597.28
पुणे111. 3598
नाशिक111.2595.73
नागपूर111.4195.73
कोल्हापूर111.0295.54

इंधन महागणार?

सध्या कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार सुरूच आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर वाढतच आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये चढ-उतार सुरू असताना देखील देशात गेल्या 50 दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. मात्र यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना मोठा फटका बसत आहे. मार्जीनमध्ये घट झाली आहे. त्यामुळे येत्या काळात पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.