Today petrol, diesel rates : कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण; इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव
आज कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण पहायला मिळत आहे. पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. जाणून घेऊयात पेट्रोल, डिझेलचे नवे दर
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढउतार सुरूच आहे. आज कच्च्या तेलाच्या दरात (Crude oil prices) मोठी घसरण पहायला मिळत असून, कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 112 डॉलरवर पोहोचले आहेत. पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे दर जारी करण्यात आले असून, कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली असताना देखील पेट्रोल, डिझेलच्या भावात (diesel rates) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल (petrol), डिझेलचे दर स्थिर आहेत. गेल्या एक महिन्यापासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. 22 मे रोजी केंद्र सरकारच्या वतीने पेट्रोल, डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या एक्साईज ड्यूटीमध्ये कपात करण्यात आली होती. एक्साईड ड्यूटी कमी झाल्यामुळे पेट्रोल प्रति लिटरमागे साडेनऊ रुपयांनी तर डिझेल प्रति लिटर सात रुपयांनी स्वस्त झाले होते. तेव्हापासून इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर आहेत. दरम्यान दुसरीकडे पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचा पुरवठा कमी करण्यात आल्याने अनेक पेट्रोलपंपावर पेट्रोल, डिझेलचा तुटवडा जाणवत आहे.
राज्याच्या प्रमुख शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव
शहरं | पेट्रोल | डिझेल |
---|---|---|
मुंबई | 111.35 | 97.28 |
पुणे | 111. 30 | 98 |
नाशिक | 111.25 | 95.73 |
नागपूर | 111.41 | 95.73 |
कोल्हापूर | 111.02 | 95.54 |
प्रमुख महानगरातील भाव
आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये इतका आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 94.24 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.03 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 92.76 रुपये इतका आहे.
अधिक दराने पेट्रोल, डिझेलची विक्री
मीडिया रिपोर्टनुसार रिलायन्स आणि नायरा सारख्या खासगी पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर दोन ते सात रुपये अधिक दराने विकत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र त्या तुलनेत देशात पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणतीही वाढ न करण्यात आल्याने त्याचा मोठा फटका हा पेट्रोलियम कंपन्यांना बसत आहे. नुकसान भरून काढण्यासाठी खासगी पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे दर वाढवण्यात आले आहेत.