Today petrol, diesel rates : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव
कच्च्या तेलाच्या दरात चढ- उतार सुरूच आहे. आज पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. जाणून घेऊयात आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव
नवी दिल्ली : देशातील पेट्रोलियम कंपन्यांकडून आज पेट्रोल, डिझेलचे (Petrol-Diesel) नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. देशात 22 मेरोजी पेट्रोल, डिझेलच्या दरात शेवटचा बदल झाला होता. 21 मेरोजी केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या अबकारी करात (Excise Duty) कपात करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर पेट्रोल प्रति लिटर साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले होते. त्यानंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार सुरूच आहे. मात्र असे असताना देखील पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आल्याने, वाढत्या महागाईपासून थोडा का होत नाही दिलासा मिळाला आहे.
राज्याच्या प्रमुख शहरातील दर
शहरं | पेट्रोल | डिझेल |
---|---|---|
मुंबई | 111.35 | 97.28 |
पुणे | 111. 30 | 98 |
नाशिक | 111.25 | 95.73 |
नागपूर | 111.41 | 95.73 |
कोल्हापूर | 111.02 | 95.54 |
देशाच्या प्रमुख शहरातील पेट्रोल, डिझेलचे दर
पेट्रोलियम कंपन्यांकडून आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोचा दर प्रति लिटर 96.72 रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये इतका आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.30 रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.24 रुपये एवढा आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.03 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 92.76 रुपये प्रति लिटर इतका आहे.
‘असे’ चेक करा आपल्या शहरातील इंधनाचे दर
तुम्ही तुमच्या शहारातील पेट्रोल, डिझेलचे दर एसएमएसच्या माध्यमातून देखील चेक करू शकता. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP <डीलर कोड> टाईप करून 9224992249 या नंबरवर एसएमएस पाठवल्यास तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाचे दर समजू शकतात. तर एचपीसीएलच्या ग्राहकांनी HPPRICE <डीलर कोड> टाईप करून 9222201122 या नंबरवर एसएमएस केल्यास तुम्हाला तुमच्या शहरातील भाव जाणून घेता येतील.