Today’s gold-silver prices : सोन्याच्या दरात आज पुन्हा तेजी; चांदी सलग दुसऱ्या दिवशी घसरली, जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात तेजी आली आहे. मात्र दुसरीकडे आज सलग दुसऱ्या दिवशी चांदीमध्ये घसरण दिसून येत आहे. जाणून घेऊयात सोने -चांदीचे भाव

Today's gold-silver prices : सोन्याच्या दरात आज पुन्हा तेजी; चांदी सलग दुसऱ्या दिवशी घसरली, जाणून घ्या आपल्या शहरातील भाव
Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 11:57 AM

मुंबई : आज पुन्हा एकदा सोन्याच्या भावात (gold rate) तेजी आल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे मात्र सलग दुसऱ्या दिवशी चांदीच्या दरात (silver prices) घसरण झाली आहे. गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,050 रुपये इतका आहे. शुक्रवारी 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46,700 इतका होता. म्हणजे आज 22 कॅरट सोन्याच्या दरात तोळ्यामागे 350 रुपयांची वाढ झाली आहे. आज 24 कॅरट सोन्याचा (gold) दर प्रति तोळा 51,330 रुपये असून, शुक्रवारी 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 50,950 एवढा होता. आज 24 कॅरट सोन्याच्या दरात 380 रुपयांची वाढ झाली आहे. चांदीच्या दरात मात्र आज सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. शुक्रवारी चांदीचा दर प्रति किलो 61,700 इतका होता. आज चांदीचा दर प्रति किलो 61,400 रुपये इतका आहे. याचाच अर्थ आज चांदीच्या दरात किलो मागे तीनशे रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे भाव दिवसातून दोनदा जाहीर होत असल्याने भावामध्ये तफावत आढळून येते.

राज्याच्या प्रमुख शहरातील सोन्याचे दर

आज सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे. राजधानी मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,050 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51,330 रुपये एवढा आहे. पुण्यात 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,150 रुपये आहे, तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51,380 रुपये एवढा आहे. उपराजधानी नागपूरमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,150 रुपये आहे, तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51,380 रुपये एवढा आहे. नाशिकमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,150 रुपये तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51,380 रुपये इतका आहे. औरंगाबादमध्ये 22 व 24 कॅरट सोन्याचा दर अनुक्रमे 47,050 आणि 51,330 रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

प्रमुख महानगरातील भाव

  1. आज राजधानी दिल्लीमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,050 रुपये असून 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51,330 रुपये एवढा आहे.
  2. चेन्नईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48,170 रुपये तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,550 रुपये आहे.
  3. मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,050 रुपये रुपये तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51,330 रुपये एवढा आहे.
  4. कोलकातामध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,050 रुपये असून 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51,330 रुपये एवढा आहे.
  5. तर आज चांदीच्या दरात प्रति किलोमागे 300 रुपयांची घसरण झाली असून, चांदीचा दर प्रति किलो 61,400 रुपयांवर पोहोचला आहे.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.