मुंबई : आज पुन्हा एकदा सोन्याच्या भावात (gold rate) तेजी आल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे मात्र सलग दुसऱ्या दिवशी चांदीच्या दरात (silver prices) घसरण झाली आहे. गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,050 रुपये इतका आहे. शुक्रवारी 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46,700 इतका होता. म्हणजे आज 22 कॅरट सोन्याच्या दरात तोळ्यामागे 350 रुपयांची वाढ झाली आहे. आज 24 कॅरट सोन्याचा (gold) दर प्रति तोळा 51,330 रुपये असून, शुक्रवारी 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 50,950 एवढा होता. आज 24 कॅरट सोन्याच्या दरात 380 रुपयांची वाढ झाली आहे. चांदीच्या दरात मात्र आज सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. शुक्रवारी चांदीचा दर प्रति किलो 61,700 इतका होता. आज चांदीचा दर प्रति किलो 61,400 रुपये इतका आहे. याचाच अर्थ आज चांदीच्या दरात किलो मागे तीनशे रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे भाव दिवसातून दोनदा जाहीर होत असल्याने भावामध्ये तफावत आढळून येते.
आज सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे. राजधानी मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,050 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51,330 रुपये एवढा आहे. पुण्यात 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,150 रुपये आहे, तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51,380 रुपये एवढा आहे. उपराजधानी नागपूरमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,150 रुपये आहे, तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51,380 रुपये एवढा आहे. नाशिकमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,150 रुपये तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51,380 रुपये इतका आहे. औरंगाबादमध्ये 22 व 24 कॅरट सोन्याचा दर अनुक्रमे 47,050 आणि 51,330 रुपये आहे.