Gold – Sliver Price : सोन्यातील गुंतवणुकीला अच्छे दिन; आज पुन्हा सोने स्वस्त, जाणून घ्या आपल्या शहरातील भाव
आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने सोन्यातील गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई : सोन्यामध्ये गुंतवणूक (Investment) करणाऱ्यांसाठी अच्छे दिन आले आहेत. सोन्याच्या (Gold) दरात सातत्याने घसरण सुरूच असून, आज देखील सोने स्वस्त झाले आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजनुसार (mcx) 24 कॅरट सोन्याच्या दरात प्रति तोळा 0.45 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर चांदीचे दर देखील स्वस्त झाले असून, चांदीच्या दरात आज 0.35 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. मार्च महिन्यात 24 कॅरट सोन्याचा भाव प्रति तोळा 56 हजारांवर पोहोचला होता. मात्र त्यानंतर सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजनुसार आज राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51 हजार रुपये इतका आहे तर 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46,750 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,220 रुपये असून, 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,870 रुपये इतका आहे. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51 हजार रुपये इतका आहे, तर 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,456 रुपये इतका आहे. सोन्याच्या किमती या दिवसातून दोनदा जाहीर होतात. तसेच सोन्याच्या दरामध्ये दागिन्याच्या घडणावळीचा खर्च देखील समाविष्ट होत असल्याने अनेक ठिकाणी सोन्याच्या दारत तफावत आढळून येते.
राज्याच्या प्रमुख शहरातील भाव
- मल्टी कमोडिटी एक्सचेंजनुसार आज सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47, 456 रुपये एवढा असून, चांदीचा दर प्रति किलो 62,040 रुपये इतका आहे.
- पुण्यात 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,456 रुपये एवढा आहे, तर चांदीचा दर प्रति किलो 62,040 रुपये इतका आहे.
- नागपूरमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47 हजार पाचशे रुपये असून, चांदीचा दर प्रति किलो 62 हजार 60 रुपये इतका आहे.
- नाशिकमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47 हजार 520 रुपये असून, चांदीचा दर प्रति किलो 62,040 रुपये इतका आहे.
- औरंगाबादमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47 हजार 520 रुपये तर चांदीचा दर 62,040 रुपये इतका आहे.