Todays Gold-Silver Rate: सोन्या, चांदीच्या घसरणीला ब्रेक, मौल्यवान धातुचे दर स्थिर
शुक्रवारी सोन्याच्या (gold) दरात मोठी घसरण झाल्याचे पहायला मिळाले होते. शुक्रवारी सोन्याच्या दरात तब्बल चार हाजारांची घसरण झाली होती. मात्र या घसरणीनंतर आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सोन्या, चांदीचे नवे दर (Silver Rat) जाहीर करण्यात आले असून, सोने आणि चांदी दोनही धातुंचे दर स्थिर आहेत.
नवी दिल्ली : शुक्रवारी सोन्याच्या (gold) दरात मोठी घसरण झाल्याचे पहायला मिळाले होते. शुक्रवारी सोन्याच्या दरात तब्बल चार हाजारांची घसरण झाली होती. मात्र या घसरणीनंतर आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सोन्या, चांदीचे नवे दर (Silver Rate) जाहीर करण्यात आले असून, सोने आणि चांदी दोनही धातुंचे दर स्थिर आहेत. गुड रिटर्न्स (Good returns) वेबसाईटनुसार शुक्रवारी सोने चार हजारांच्या घसरणीसह प्रती तोळा 47300 रुपयांवर पोहोचले होते. मात्र सोमवारी बाजार ओपन होताच सोन्या-चांदीचे नवे दर जाहीर झाले आहेत. नव्या दरानुसार आठवड्याच्या पहिल्या दिवशी दोनही धातुंच्या किमतीमध्ये कोणताही बदल झाला नसून दर स्थिर आहेत. शुक्रवारी अचानक सोन्याच्या दरात प्रति तोळा चार हजारांची घसरण झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण होते. तर दुसरीकडे चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नसून शुक्रवारी मागील आठवड्याच्या शेवटच्या दिवशी चांदीचा दर प्रति किलो 68 हजार रुपये इतका होता. आज सोमवारी देखील दर स्थिर असून तो प्रति किलो 68 हजार इतकाच आहे.
प्रमुख शहरातील सोन्याचे दर
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,300 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,600 प्रति 10 ग्रॅम एवढा आहे. पुण्यात प्रति दहा ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,400 एवढा आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51700 एवढा आहे. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47380 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51680 रुपये इतका आहे. चांदीचा दर प्रति किलो 68 हजार रुपये इतका आहे. दरम्यान सोन्याची खरेदी करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी सोन्याचे दर हे त्याची शुद्धता आणि दागिन्यांच्या डिजाईनवरून थोड्या-फार फरकाने कमी जास्त होऊ शकते.
सोन्यातील गुंतवणूक वाढली
दरम्यान दुसरीकडे रशिया आणि युक्रेन युद्धामुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत होती. सोन्याचे भाव वाढत असल्याने गुंतवणूकदार सोन्यातील गुंतवणुकीकडे आकर्षित झाल्याचे पहायला मिळाले. गेल्या काही दिवसांमध्ये सोन्यामधील गुंतवणूक अचानक वाढली आहे. मात्र शुक्रवारी सोन्याच्या दरात अचानक चार हजारांची घसरण झाल्याने गुंतवणूकदार गोंधळात पडल्याचे दिसून आले.
संबंधित बातम्या
Inflation : कच्च्या तेलाच्या दराला आग, दैनंदिन वस्तूंचे भाव वाढण्याची चिन्ह, आणखी काय काय महागणार?