मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol And Diesel) किंमती (Price) दिवसागणिक वाढतायेत. 22 मे या तारखेपासून इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नसला तरी इंधन कंपन्यांचा तोटा वाढतो आहे. यातच आजच्या दिवसांचा पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचा (Diesel) दर जाहीर झाला आहे. राजधानीत आज पेट्रोलचा दर 96.72 रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर 89.62 इतका आहे. मुंबईमध्ये पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लीटर इतका दरानं विकलं जातंय. तर दुसरीकडे इतर मोठ्या शहरातील इंधन दर बघितल्यास कोलकातामध्ये पेट्रोल 106.0 प्रति लिटर इतकं आहे. तरत डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर इतका आहे. देशातील या प्रमुख चार मोठ्या शहरांमधील इंधन दरवाढीची तुलना करायची झाल्यास मुंबईत इंधनाचे दर सर्वाधिक असल्याचं दिसू येतंय. तर दुसरीकडे राजधानी दिल्ली पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वात कमी आहे.
देशातील काही भागांमध्ये पेट्रोल पंप चालक इंधन पुरवठ्यात अनेक अडचणी असल्याचं सांगून मर्यादीत वेळेसाठीच पेट्रोल आणि इंधन विकतायेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महाग होत आहे. सध्या त्याची किंमत देखील मोठी आहे. तेल विक्री करणाऱ्या कंपन्यांचं म्हणनं आहे की क्रूडच्या वाढत्या किमती आणि स्थिर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे त्यांचे मोठं नुकसान होतंय. त्यामुळेच त्यांचा तोटा कमी करण्यासाठी पेट्रोल पंप चालक मर्यादित वेळेसाठी इंधनाची विक्री करतायेत.
शहराचं नाव | पेट्रोलचा दर (प्रति लिटर) | डिझेलचा दर (प्रति लिटर) |
---|---|---|
मुंबई | 111.35 | 97.28 |
नागपूर | 111.38 | 95.88 |
पुणे | 111.25 | 95.72 |
नाशिक | 111.74 | 96.20 |
कोल्हापूर | 111.02 | 95.54 |
राजस्थानमध्ये पेट्रोल पंप चालकांनी रात्री 9 वाजेनंतर पेट्रोलची विक्री बंद केली आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या तोट्यात असतानाही सुरू आहे. तर खासगी क्षेत्रातील रिटेल युनिट्स जसे की रिलायन्स-बीबी आणि नायरा एनर्जी यांनी तोटा भरून काढण्यासाठी मर्यादेत ऑपरेशन केले आहेत. काही ठिकाणी, नायरा सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्सपेक्षा 3 रुपये प्रति लिटर अधिक इंधन विकत आहे. दिल्लीत सध्या पेट्रोल 96.72 आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे.
गेल्या महिन्यात केंद्र सरकारकडून पेट्रोल, डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या अबकारी करात कपात करण्यात आली होती. अबकारी करात कपात करण्यात आल्यामुळे पेट्रोल प्रति लिटर साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले आहे. तेव्हापासून इंधनाच्या दरात कोणताही बदल झाला नसून, पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर आहेत.