Today’s petrol, diesel prices : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे दर जारी, सलग चौदाव्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर

आज पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे (Fuel) नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील इंधनाच्या दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल, डिझेलच्या (Petrol-Diesel) किमती स्थिर असल्याचे पहायला मिळत आहे.

Today's petrol, diesel prices : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे दर जारी, सलग चौदाव्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर
पेट्रोल, डिझेलचे दर Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 6:40 AM

नवी दिल्ली : आज पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे (Fuel) नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील इंधनाच्या दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल, डिझेलच्या (Petrol-Diesel) किमती स्थिर असल्याचे पहायला मिळत आहे. आज सलग चौदाव्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे दर (Petrol Diesel Rate) स्थिर ठेवण्यात आले आहेत. सर्वच गोष्टी महाग होत असताना गेल्या चौदा दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 22 मार्च ते सहा एप्रिल या काळात पेट्रोल, डिझेलच्या किमतीत मोठी दरवाढ पहायला मिळाली होती. पेट्रोलचे दर प्रति लिटर दहा रुपयांपेक्षा अधिक वाढले होते. मात्र सहा एप्रिलनंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरानुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 105.41 रुपये आहेत, तर डिझेलचे दर प्रति लिटर 96.67 रुपये इतके आहेत. मुंबईमध्ये पेट्रोल 120.51 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेल 104.77 रुपेय प्रति लिटर आहे.

प्रमुख महानगरातील पेट्रोल, डिझेलचे दर

पेट्रोलियम कंपन्यांकडून आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार इंधनाच्या दराममध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. राज्यभरात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 105.41 रुपये आहेत, तर डिझेलचे दर प्रति लिटर 96.67 रुपये इतके आहेत. मुंबईमध्ये पेट्रोल 120. 51 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेल 104.77 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल प्रति लिटर 110.85 रुपये तर डिझेल 100.94 रुपये लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल, डिझेल अनुक्रमे 115.12, 99.83 रुपये लिटर आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील भाव

  1. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 120.51 रुपये तर डिझेल 104.77 रुपये लिटर आहे.
  2. नागपूरमध्ये पेट्रोलचे भाव प्रति लिटर 120.15 तर डिझेल 102.89 रुपये लिटर आहे.
  3. परभणीत पेट्रोलचा दर प्रति लिटर 123.53 रुपये आहे. तर डिझेलचा भाव 106.10 रुपये प्रति लिटर इतका आहे.
  4. पुण्यात पेट्रोल, डिझेल अनुक्रमे 120.51 आणि 104.77 रुपये लिटर आहे
  5. औरंगाबादेत पेट्रोल 120.15 तर डिझेल 104.40 रुपये लिटर आहे.
Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.