नवी दिल्ली : आज पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे (Fuel) नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील इंधनाच्या दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल, डिझेलच्या (Petrol-Diesel) किमती स्थिर असल्याचे पहायला मिळत आहे. आज सलग चौदाव्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे दर (Petrol Diesel Rate) स्थिर ठेवण्यात आले आहेत. सर्वच गोष्टी महाग होत असताना गेल्या चौदा दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 22 मार्च ते सहा एप्रिल या काळात पेट्रोल, डिझेलच्या किमतीत मोठी दरवाढ पहायला मिळाली होती. पेट्रोलचे दर प्रति लिटर दहा रुपयांपेक्षा अधिक वाढले होते. मात्र सहा एप्रिलनंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरानुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 105.41 रुपये आहेत, तर डिझेलचे दर प्रति लिटर 96.67 रुपये इतके आहेत. मुंबईमध्ये पेट्रोल 120.51 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेल 104.77 रुपेय प्रति लिटर आहे.
पेट्रोलियम कंपन्यांकडून आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार इंधनाच्या दराममध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. राज्यभरात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 105.41 रुपये आहेत, तर डिझेलचे दर प्रति लिटर 96.67 रुपये इतके आहेत. मुंबईमध्ये पेट्रोल 120. 51 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेल 104.77 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल प्रति लिटर 110.85 रुपये तर डिझेल 100.94 रुपये लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल, डिझेल अनुक्रमे 115.12, 99.83 रुपये लिटर आहे.