Today petrol, diesel rates : पेट्रोल, डिझेलमध्ये पुन्हा दरवाढ? जाणून घ्या आजचे भाव
कच्च्या तेलाच्या भावात तेजी पहायला मिळत असताना, पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. जाणून घेऊयात राज्यासह देशाच्या प्रमुख शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव
मुंबई : देशातील प्रमुख पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर (New fuel rates) जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Price) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात वाढत असलेले कच्च्या तेलाचे भाव पहाता भारतात लवकरच पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर (Crude oil prices) गगनाला भिडले आहेत. कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल 122 डॉलरवर पोहोचले आहेत. येत्या काळात त्यामध्ये आणखी वाढ होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि काही युरोपीयन राष्ट्रांकडून रशियाकडून करण्यात येणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या दरात वाढ पहायला मिळत आहे. रशियाकडून भारताला सवलतीच्या दरात तेल मिळत होते, मात्र लवकरच रशियाकडून ही सवलत बंद होणार आहे. त्यामुळे भारतात पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
राज्याच्या प्रमुख शहरातील दर
शहरं | पेट्रोल | डिझेल |
---|---|---|
मुंबई | 111.35 | 97.28 |
पुणे | 111. 30 | 98 |
नाशिक | 111.25 | 95.73 |
नागपूर | 111.41 | 95.73 |
कोल्हापूर | 111.02 | 95.54 |
देशाच्या प्रमुख महानगरातील भाव
पेट्रोलियम कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर 96.72 रुपये एवढा असून, डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये एवढा आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.35 रुपये आहे. तर डिझेलचा रेट प्रति लिटर 97.28 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर 102.63 रुपये आहे. तर डिझेलचा भाव प्रति लिटर 94.24 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा रेट प्रति लिटर 106.03 रुपये असून, डिझेलचा रेट 92.76 रुपये इतका आहे. पेट्रोल, डिझेलच्या भावाची तुलना केल्यास देशात सर्वात महाग पेट्रोल हे मुंबईमध्ये आहे, तर सर्वात स्वस्त पेट्रोल दिल्लीमध्ये आहे.
कर कपातीमुळे पेट्रोल, डिझेल स्वस्त
गेल्या महिन्यात केंद्र सरकारकडून पेट्रोल, डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या अबकारी करात कपात करण्यात आली होती. अबकारी करात कपात करण्यात आल्यामुळे पेट्रोल प्रति लिटर साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले आहे. तेव्हापासून इंधनाच्या दरात कोणताही बदल झाला नसून, पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर आहेत.