Tomato Onion Price : टोमॅटोनंतर कांदा पण रडवणार? केंद्र सरकारचा काय आहे मास्टरप्लॅन

Tomato Onion Price : टोमॅटोनंतर आता कांदा पण देशातील जनतेला रडवणार का? टोमॅटोच्या किंमती काही ठिकाणी 220-300 रुपयांच्या घरात पोहचल्या आहेत. कांद्याचे पण असेच वांदे होणार का? काय आहे केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन

Tomato Onion Price : टोमॅटोनंतर कांदा पण रडवणार? केंद्र सरकारचा काय आहे मास्टरप्लॅन
Follow us
| Updated on: Jul 16, 2023 | 3:45 PM

नवी दिल्ली | 16 जुलै 2023 : गगनाला भिडलेल्या टोमॅटोने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. टोमॅटोने आतापर्यंतचे दरवाढीचे रेकॉर्ड (Tomato Price Record) कधीचेच मोडीत काढले आहेत. टोमॅटोचा भाव आता 500 रुपयांवर पोहचतो की काय, असे टोमणे केंद्र सरकारला ऐकावे लागत आहे. त्यामुळे इतर भाजीपाल्यांविषयी केंद्र सरकार अलर्ट मोडवर आहे. विशेषतः कांद्याचा यापूर्वीचा अनुभव कटू असल्याने केंद्र सरकार (Central Government) त्याबाबत अगोदरच तजवीज करत आहे. यंदा भाजीपाल्याच्या किंमती भूतो न भविष्यती अशा वाढल्या आहेत. टोमॅटोच्या वाढत्या किंमतीविषयी केंद्र सरकारच्या बेफिकरीने व्यापारी आणि दलालांनी मलिदा लाटला. आता कुठं काही शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे. त्यांना कोट्यवधीची लॉटरी लागली आहे. कांदा (Onion Price) पण सर्वसामान्यांचा वांदा तर करणार नाही ना?

खरीपाची तयारी

सध्या देशात खरीपातील पिकांची पेरणी सुरु आहे. शेतकरी मशागतीला लागले आहेत. ऑक्टोबरमध्ये खरीप पिकांची आवक सुरु होईल. सध्या रब्बी कांद्याची खरेदी सुरु आहे. रब्बी पिकातून आवक सुरु आहे. खरीपाच्या कांद्याची लागवड सुरु असून ऑक्टोबर महिन्यात पीक हाती येईल.

हे सुद्धा वाचा

मध्यंतरी दरवाढ

रब्बी पिकांचा पुरवठा अजून काही महिन्यानंतर राहिल. पण त्यानंतर खरिपाचे पीक येईपर्यंतच्या एका महिन्यात कांद्याची दरवाढ होण्याची भीती आहे. किंमती दबावाखाली असतात. खरिपाचे पीक येईपर्यंत किंमतीत चढउतार होतो. दरवर्षी हा अनुभव येतो.

कांदा अधिक काळ टिकणार

कांदा सडू नये आणि अधिक काळ टिकावा यासाठी प्रयत्न सुरु आहे. परमाणु ऊर्जा विभाग आणि भाभा परमाणु अनुसंधान केंद्र या दोन संस्था त्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग सुरु आहे. महाराष्ट्रातील लासलगावमध्ये कोबाल्ट-60 मधून गामा रेडिएशनसह 150 टन कांद्यावर प्रयोग करण्यात येत आहे. त्यामुळे कांदा अधिक काळ टिकणार आहे.

इतक्या कांद्याची खरेदी

2022-23 मध्ये केंद्र सरकारने PSF अंतर्गत रब्बी -2022 पिकांतून विक्रमी 2.51 लाख मेट्रिक टन खांद्याची खरेदी केली होती. सप्टेंबर 2022 आणि जानेवारी 2023 दरम्यान प्रमुख केंद्रावर त्याचा पुरवठा करण्यात आला.

देशात काय आहे भाव

भारतात 65 टक्के कांदा उत्पादन एप्रिल-जून या दरम्यान होते. हा रब्बीतील कांदा असतो. ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात रब्बीतील कांदा हाती येतो. त्यामुळे देशात कांद्याच्या किंमती आटोक्यात राहतात. देशात 15 जुलै रोजी सर्वात स्वस्त कांदा 10 रुपये प्रति किलो दराने मध्यप्रदेशातील निमच शहरात विक्री झाली. तर नागालँडमधील शेमेटर या शहरात सर्वात महाग 65 रुपये किलो दराने कांद्याची विक्री झाली. सरासरी 26.79 रुपये किलोने कांदा विक्री होत आहे.

बंपर साठा

ग्राहक मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी देशात कांद्याच्या साठ्याबाबत माहिती दिली. त्यानुसार, केंद्राने 3 लाख टन कांद्याची खरेदी केली आहे. गेल्यावर्षीच्या बंपर स्टॉकपेक्षा हा आकडा 20 टक्के अधिक आहे. त्यामुळे कांद्याच्या किंमती नियंत्रीत राहण्यास मदत होणार आहे. केंद्र सरकारने कांद्याचा मागचा अनुभव लक्षात घेत बंपर स्टॉक केला आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.