ITR Last Date | आता उरला उद्याचाच दिवस, पुढे भरावा लागेल दंड, किती बसेल भुर्दंड?

ITR Last Date | वेळेवर आयकर विवरणपत्र भरल्यास तितका लवकर परतावा येईल. पण तो वेळेत न भरल्यास तुम्हाला भूर्दंड सहन करावा लागेल. आयटीआर भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे.

ITR Last Date | आता उरला उद्याचाच दिवस, पुढे भरावा लागेल दंड, किती बसेल भुर्दंड?
आता उरला आता एक दिवसImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 3:56 PM

ITR Last Date | आयकर विवरण पत्र (ITR) भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै रोजी संपणार आहे. म्हणजे आता तुमच्या हातात आजचा उरलेला दिवस आणि उद्याचाच दिवस बाकी आहे. या दरम्यान तुम्ही आयटीआर भरला नाही तर 1 ऑगस्टपासून तुम्हाला विलंब शुल्कासह दंडाची (Penalty including late fee)तरतूद करुन ठेवावी लागेल. तसेच आयटीआर भरण्यास जेवढा उशीर कराल तेवढी कायदेशीर अडचणींचा ही सामना करावा लागेल. हा सर्व मनस्ताप टाळण्यासाठी प्राप्तीकर खाते (Income Tax Department) सुरुवातीपासून आयटीआर भरण्यासाठी धोशा लावते. पण करदाते निवांत भरु या विचारात तारीख जवळ आली की आयटीआर भरण्याच्या प्रक्रियेत गुंततात. त्यात कधी कधी फार उशीर होतो आणि हाती दंडाशिवाय काहीच लागत नाही. केंद्रीय महसूल सचिवांनी (Central Revenue Secretary) यापूर्वीच गेल्या दोन-तीन वर्षांप्रमाणे यंदा विवरण पत्र भरण्यासाठी कुठलीही मुदत वाढ देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अंतिम मुदत वाढतेच या भ्रमात तुम्ही वेळकाढूपणा करत असाल तर आता दीड दिवस तुमच्या हातात आहे. त्याचे सोनं करा.

हे सुद्धा वाचा

5 कोटीचा आकडाही रडतपडत

31 जुलैपर्यंत सुमारे सात कोटी आयटीआर भरणे अपेक्षित आहेत, मात्र 28जुलैपर्यंत हा आकडा 5 कोटींपर्यंतही पोहोचला नव्हता. अशा परिस्थितीत रिटर्न फाइलिंग पोर्टलवरचा भार शेवटच्या दोन दिवसांत वाढू शकतो आणि अतिरिक्त भारामुळे पोर्टलचा वेग मंदावू शकतो. त्यामुळे वेळेत आयटीआर भरण्याचे तुमचं स्वप्न भंगू शकतं. वेळेवर आयटीआर भरण्याचे अनेक फायदे आहेत. तुम्हाला लागलीच आयकर परताव्यासाठी दावा दाखल करता येईल. तसेच अनेक ठिकाणी आयटीआर फाईल केल्याने काम करणं सुलभ होईल. प्राप्तीकर खात्याने ट्विट केल्याप्रमाणे, 28 जुलै 2022 पर्यंत 4.09 कोटीहून अधिक लोकांनी आयटीआर दाखल केला आहे. 28 जुलै रोजी 36 लाखांहून अधिक आयटीआर दाखल झाले होते. मूल्यांकन वर्ष 2022-23साठी आयटीआर भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे. जर तुम्ही अजून आयटीआर भरला नसेल, तर ते ताबडतोब भरा आणि विलंब शुल्क टाळा.

दंड किती?

प्राप्तीकर खात्याने ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे की, त्यांनी 31 जुलैपर्यंत आयटीआर दाखल करावा आणि विलंब शुल्कासहीत दंड टाळावा. म्हणजेच 1 ऑगस्टपासून तुम्हाला आयटीआर फाईल केल्यावर दंड भरावा लागणार आहे. वेळेवर रिटर्न भरून तुम्ही हे टाळू शकता. मुदतीनंतर आयटीआर दाखल केल्यास दंड होऊ शकतो. मुदतीनंतर रिटर्न भरल्यास पाच लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्नासाठी 1 हजार रुपये विलंब शुल्क आकारले जाणार आहे. 5 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्नावर विलंब शुल्क 5,000 रुपये.

स्वत:च इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करा

आयटीआर भरण्यासाठी तुम्हाला आयकर विभागाच्या वेबसाईटवर https://www.incometax.gov.in/iec/foportal युजर आयडी आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करणं आवश्यक आहे. इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड (Pan Card), आधार कार्ड, बँक अकाउंट नंबर, इन्व्हेस्टमेंट डिटेल्स आणि फॉर्म 16 किंवा फॉर्म 26 एएसची आवश्यकता असेल.

Non Stop LIVE Update
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?.
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका.
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?.