कोटक प्रायव्हेट बँक (Kotak Private Banking) आणि हुरून इंडिया (Hurun India) यांनी देशातील सर्वात श्रीमंत अशा 10 महिलांच्या (Top 10 Wealthiest Indian Women) नावांची यादी जाहीर केली आहे. 31 डिसेंबर 2021 पर्यंत ज्यांच्याकडे सर्वात जास्त संपत्ती होती, अशा महिलांच्या नावाचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. कोटक प्रायव्हेट बँक आणि हुरून इंडिया यांच्यातर्फे जाहीर करण्यात आथानावर लेल्या यादीत काही आश्चर्यकारक गोष्टी आढळून आल्या आहेत, ज्यावर विश्वास बसत नाही. या यादीतील काही महिलांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तर काहींच्या संपत्तीत थोडी घट झाली आहे. जाणून घेऊया कोण आहेत भारतातील या टॉप 10 श्रीमंत महिला.
टॉप 10 श्रीमंत महिलांच्या यादीत यंदा दोन नव्या नावांचा समावेश आहे. देशातील टॉप 10 श्रीमंत महिलांच्या यादीत पहिल्या स्थानावर असलेल्या रोशनी नाडर मल्होत्रा यांची संपत्ती 84,330 कोटी रुपये इतकी आहे. तर 10 व्या स्थानावर असलेल्या रेणू मुंजाल यांची संपत्ती 6,620 कोटी रुपये आहे. ‘नायका’च्या संस्थापक व सीईओ फाल्गुनी नायर यांच्या संपत्तीत तब्बल 963 टक्क्यांनी वाढ झाली आहे. टॉप 10 श्रीमंत महिलांच्या यादीतील 3 महिला दिल्लीतील तर 2 जणी मुंबईच्या रहिवासी आहेत.
देशातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत रोशनी नाडर मल्होत्रा पहिल्या स्थआनावर आहेत. HCL Technologies च्या चेअरमन असणाऱ्या रोशनी नाडर सलग दुसऱ्या वर्षीही प्रथम क्रमांक राखून आहेत. रोशनी यांची एकूण संपत्ती 84,330 कोटी रुपये इतकी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांच्या संपत्तीमध्ये 54 टक्के वाढ झाली आहे. रोशनी या देशाची राजधाी, दिल्लीच्या रहिवासी आहेत.
श्रीमंत महिलांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत ‘नायका’ कंपनीच्या संस्थापक व सीईओ फाल्गुनी नायर. त्यांची एकूण संपत्ती आहे 57,520 कोटी रुपये. विशेष म्हणजे त्यांच्या संपत्तीमध्ये 963 टक्के इतकी मोठी वाढ झाली आहे. फाल्गुनी नायर या देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्याा मुंबईच्या रहिवासी आहेत.
‘बायोकॉन’ या बायोफार्मासिटिकल कंपनीच्या संस्थापक असलेल्याया किरण मजूमदार शॉ यांनी या यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. महत्वाचे म्हणजे त्यांच्या संपत्तीत 21 टक्क्यांची घट झाली असून त्या दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर आल्या आहेत. त्यांची एकूण संपत्ती 29,030 कोटी रुपय आहे. त्या बंगळुरू येथे राहतात.
देशातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत नीलिमा मोतापर्ती चौथ्या स्थानावर आहेत. Divi’s Lab च्या अध्यक्ष असलेल्या नीलिमा यांची एकूण संपत्ती 28,180 कोटी रुपये आहे. त्यांच्या संपत्तीमध्ये 51 टक्के वाढ झाली आहे. नीलिमा या हैदराबादच्या रहिवासी आहेत.
या यादीत ‘झोहो’च्या राधा वेम्बू पाचव्या स्थानावर, USV च्या लीना गांधी तिवारी सहाव्या क्रमांकावर , ‘थरमॅक्स’च्य’ अनु आगा आणि मेहेर पद्मजी सातव्या स्थानावर आहेत. तर या यादीत एक नवे नाव जोडले गेले असून ते आहे ‘Confluent’ कंपनीच्या नेहा नारखेडे यांचे, या यादीत नेहा त्या आठव्या स्थानावर आहेत. ‘डॉ. लाल पॅथ लॅब्स’च्या वंदना लाल 9व्या स्थानी तर हिरो ‘फिनकॉर्प’च्या रेणू मुंजाल 10 व्या स्थानी आहेत.