Dhanteras : धनत्रयोदशीला लाखो कोटींची उलाढाल..व्यापाऱ्यांची चांदीच चांदी

Dhanteras : धनत्रयोदशीला देशभरात लाखो कोटींची उलाढाल झाली आणि व्यापाऱ्यांची चांदीच चांदी झाली आहे..

Dhanteras : धनत्रयोदशीला लाखो कोटींची उलाढाल..व्यापाऱ्यांची चांदीच चांदी
दिवाळीत कोट्यवधींची उलाढालImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 23, 2022 | 10:30 PM

नवी दिल्ली : या वर्षी शनिवार आणि रविवार हे दोन दिवस देशभरात व्यापाराची मोठी उलाढाल झाली. धनत्रयोदशीच्या (Dhanteras) निमित्ताने देशभरात लाख कोटींचा व्यवहार पार पडला. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) यांनी देशभरात झालेल्या या उलाढालीने व्यापाऱ्यांमध्ये जोष भरल्याचे सांगितले आहे.

दोन वर्षानंतर कोरोनाचे मळभ हटले आणि यंदा दिवाळीपूर्वीच निर्बंध हटले. निर्बंध हटल्यानंतर पहिल्यांदाच दिवाळी मोकळ्या वातावरणात साजरी करण्यात येते आहे. त्यामुळे यंदा बाजारपेठा प्रचंड गजबजलेल्या होत्या.

CAIT च्या अंदाजानुसार, यंदा फेस्टिव्ह सिझनमध्ये विक्रीचा आकड्याने 1 लाख 50 हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांची चांदीच चांदी झाली. व्यापारी वर्ग दोन वर्षानंतर खऱ्या अर्थाने फायद्यात राहिला.

हे सुद्धा वाचा

यंदाच्या दिवाळीचं आणखी एक विशेष महत्व म्हणजे, व्यापाऱ्यांनी यंदा भारतीय उत्पादनांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे बाजारात भारतीय मालाला उठाव मिळाला. त्यामुळे चीनला मोठे नुकसान सहन करावे लागेल आहे. चीनचे जवळपास 75 हजार कोटींचे नुकसान होण्याचा अंदाज आहे.

ऑल इंडिया ज्वेलर्स आणि गोल्डस्मिथ फेडरेशनच्या दाव्यानुसार गेल्या वर्षीपेक्षा भारतात कमी सोने खरेदी करण्यात आले. 2021 च्या तुलनेत, 2022 मध्ये सोन्याच्या आयातीत 11.72% टक्क्यांची घसरण आली आहे.

गेल्या वर्षी भारतात पहिल्या सहामाहीत 346.38 टन सोने आयात करण्यात आले होते. तर यंदा 308.78 टन सोने आयात करण्यात आले आहे. सोन्याच्या आयातीत घट आली आहे.

दिवाळीच्या दोन दिवसांत देशभरात जवळपास 25 हजार कोटी रुपयांच्या सोने-चांदीची विक्री झाली. यामध्ये सोने-चांदीचे शिक्के, दागिने, मुर्ती, भांडी यांची विक्री करण्यात आली.

एकीकडे सोन्याची आयात घटली असली तरी सराफा बाजारात सोने खरेदी वाढली आहे. जुलै ते सप्टेंबर या महिन्यात भारतातील सराफा बाजारात सोन्याची मागणी वाढली. भारतीय बाजारात सोन्याच्या मागणीत 80 टक्के वाढ झाली आहे.

दिवाळीच्या दोन दिवसात ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये जवळपास 6 हजार कोटी, फर्निचर जवळपास 1500 कोटी, कम्प्युटर आणि संबंधित व्यवसाय जवळपास 2500 कोटींची उलाढाल झाली आहे.

तर FMCG क्षेत्रात 3 हजार कोटी, इलेक्ट्रॉनिक्स सामानमध्ये जवळपास 1 हजार कोटी, रेडीमेड गारमेंट आणि फॅशनेबल कपड्यात जवळपास 1500 कोटींची उलाढाल झाली आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.