TRAI report : फेब्रुवारी महिन्यात जिओला मोठा धक्का ग्राहकांच्या संख्येत घट, तर एअरटेलचे ग्राहक 15 लाखांनी वाढले
टेलिकॉम मार्केट रेग्युलेटर ट्राय (TRAI) ने दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारीमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात रिलायन्स जिओच्या ग्राहकांमध्ये (Reliance Jio subscribers) घसरण झाली आहे. ट्रायकडून नुकतीच फेब्रुवारी महिन्यातील टेलिकॉम क्षेत्रातील ग्राहकांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
टेलिकॉम मार्केट रेग्युलेटर ट्राय (TRAI) ने दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारीमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात रिलायन्स जिओच्या ग्राहकांमध्ये (Reliance Jio subscribers) घसरण झाली आहे. ट्रायकडून नुकतीच फेब्रुवारी महिन्यातील टेलिकॉम क्षेत्रातील ग्राहकांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. या आकेडवारीनुसार फेब्रुवारी 2022 मध्ये जिओचे ग्राहक तब्बल 36 लाखांनी कमी झाले आहेत. सध्या जीओच्या एकूण ग्राहकांची संख्या 40.27 इतकी आहे. सलग तिन महिन्यांपासून जीओ ग्राहकांची संख्या घटत आहे. याच महिन्यात आयडिया आणि व्होडाफोनला देखील मोठा फटका बसला आहे. फेब्रुवारी महिन्यात आयडिया आणि व्होडाफोनचे तब्बल 15 लाख ग्राहक कमी झाले आहेत. सध्या स्थितीमध्ये आता व्होडाफोन आणि आयडियाच्या ग्रहाकांची एकूण संख्या 26.35 कोटी इतकी आहे. फेब्रुवारी महिन्यात एअरटेल (Airtel) हीच अशी एकमेव कंपनी होती, की तिच्या ग्राहक संख्येत वाढ झाली आहे. एअरटेलच्या ग्राहकांनामध्ये 15.9 लाखांची वाढ झाली आहे.
एअरटेलच्या ग्राहकांमध्ये वाढ
देशात यावर्षी टेलिकॉम ग्राहकांच्या संख्येत घट झाल्याचे पहायला मिळत आहे. सध्या एकूण ग्राहकांची संख्या 116.60 कोटी इतकी आहे. ट्रायने दिलेल्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी महिन्यात आयडिया,व्हडाफोन आणि जिओला मोठा धक्का बसला आहे. त्यांची ग्राहक संख्या घसरली आहे. जीओची ग्राहक संख्या तर गेल्या तीन महिन्यांपासून कमी होत आहे. फेब्रुवारी महिन्यात जिओचे ग्राहक तब्बल 36 लाखांनी कमी झाले आहेत. तर आयडिया आणि व्होडाफोनचे देखील 15 लाख ग्राहक कमी झाले आहेत. एअरटेल असे एकमेव नेटवर्क आहे, की ज्याच्या ग्राहक संख्येत फेब्रुवारी महिन्यात वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात एअरटेलचे ग्राहक 15.9 लाखांनी वाढले आहेत.
फेब्रुवारी महिन्यात टेलीफोन ग्राहकांच्या संख्येत घट
ट्रायच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की. भारतामधील टेलिफोन ग्राहकांची संख्या देखील झपाट्याने कमी होत आहे. जानेवारी 2022 ते फेब्रुवारी 2022 अशा दोन महिन्यांमध्ये टेलिफोन ग्राहकांची संख्या 116.94 कोटींहून कमी होऊन 116.60 कोटींवर आली आहे. म्हणजेच ग्राहकांच्या संख्येत 0.29 टक्क्यांची घसरण झाली आहे.
संबंधित बातम्या
Share Market Updates : शेअर बाजार सुरू होताच सेंसेक्स वधारला, मात्र गुंतवणूकदारांमध्ये धाकधूक कायम