Hydrogen Car | महागड्या पेट्रोल-डिझेलच्या जाचातून लवकरच सूटका, प्रति किलोमीटर मोजा केवळ 40 पैसे! इलेक्ट्रिक कारनंतर नितीन गडकरींच्या या प्रयोगाची सध्या चर्चा?

Gadkari on Hydrogen Car News | महागड्या पेट्रोल डिझेलच्या किंमतींनी (Petrol Diesel Price) हैराण आहात? तर सरकार पातळीवरही या समस्येतून सूटका करण्यासाठी मंथन सूरु आहे. केवळ 40 पैशात एक किलोमीटरची सोय झाली तर? इलेक्ट्रिक कार नंतर गडकरी यांच्या या प्रयोगाची सध्या चर्चा सुरु आहे.

Hydrogen Car | महागड्या पेट्रोल-डिझेलच्या जाचातून लवकरच सूटका, प्रति किलोमीटर मोजा केवळ 40 पैसे! इलेक्ट्रिक कारनंतर नितीन गडकरींच्या या प्रयोगाची सध्या चर्चा?
हायड्रोजन कार चं स्वप्न सत्यात?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 10:54 AM

Gadkari on Hydrogen Car News | पेट्रोल डिझेल किंमतींनी (Petrol Diesel Price) नागरीक आणि कष्टकरी वर्ग पार मेटाकुटीला आला आहे. सरकारी पातळीवर कितीही कर कपात (Tax Exemption) केली तरी किंमती काय पूर्व पातळीवर येणार काय मंडळी? तुम्हाला त्यासाठी जादा दाम मोजावेच लागतील. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे जनतेच्या रोषाची सरकारी पातळीवर (Government ) ही दखल घेतली जात आहे. पेट्रोल डिझेलला पर्याय शोधण्याचे प्रयोग सुरु आहेत. इलेक्ट्रिक कार (Electric Car) हा त्यातीलच एक नवा प्रयोग आहे. सीएनजी(CNG), एलपीजी (LPG) हे पर्याय आहेतच. पण याऐवजी अगदी स्वस्तातील पर्यायाची चाचपणी सुरु आहे. त्यात अवघ्या 40 पैशांत एक किलोमीटर अंतर कापण्याचा एक अफलातून प्रयोगाचीही चर्चा आहे. हायड्रोजन कार (Hydrogen Car) विषयी ही चर्चा रंगली आहे. केवळ 8 रुपयाच्या एक लिटर इंधनात हा प्रयोग यशस्वी करण्याच्या चाचण्या सुरु आहेत. केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari news) यांनी या प्रयोगासाठी कंबर कसली आहे. ते तर थेट संसदेत हायड्रोजन कारने पोहचले, त्याचवेळी या चर्चांना उधाण आले होते. तर आता या चर्चांना मुर्त रूप येवो एवढाच काय तो धावा आता आपण करु शकतो नाही का?

पहिल्या फेरीतील चर्चांना यश

नितीन गडकरी यांनी हायड्रोजन कार उत्पादन कंपन्यांशी पहिली फेरी यशस्वी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे देशात लवकरच हायड्रोजनवर चालणाऱ्या चारचाकी दिसतील. नागरिकांना अगदी स्वस्तात यासाठीचे इंधन उपलब्ध करुन देण्याची सरकारची योजना आहे. नागरिकांना केवळ 8 रुपये प्रति लिटर इंधन मिळण्याची शक्यता आहे. स्वत: नितीन गडकरी यांनी हायड्रो पॉवर कारमधून संसदेत पोहचले आहेत. इलेक्ट्रिक व्हेईकल पेक्षा ही या कार शून्य कार्बन उत्सर्जन करत असल्याने तो सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. हे वाहन संपूर्णतः पर्यावरण पूरक असल्याने सरकार या पर्यायवर भर देत आहे. या वाहनातून पाण्याशिवया इतर कोणत्याही पदार्थाचे उत्सर्जन होणार नाही. विशेष म्हणजे ग्रीन हायड्रोजन(Green Hydrogen) अक्षय ऊर्जा आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या बायोमासपासून (biomass) तयार केला जाऊ शकतो. चर्चेची पहिली फेरी यशस्वी ठरल्याने आता अंतिम फेरीनंतर सरकारी पातळीवर या वाहनांसाठी कंपन्यांना कार उत्पादनाची ऑर्डर देण्यात येईल. तसेच सार्वजनिक वापरासाठी ही वाहने बाजारात आणण्याची घाई करण्यात येणार आहे. तसेच इंधनाचा पुरवठा करण्याची व्यवस्था ही करण्यात येणार आहे. त्यासाठी जागोजागी पंप उभारण्याची सोय करण्यात येणार आहे.

ग्रीन हायड्रोजन म्हणजे काय?

ग्रीन हायड्रोजन हा ऊर्जेचा स्वच्छ स्रोत मानण्यात येतो. ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी पाण्यातून हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळे केले जातात. या प्रक्रियेत इलेक्ट्रोलायझरचा वापर केला जातो. इलेक्ट्रोलायझर अक्षय ऊर्जा (Renewable Energy) वापरते. यामध्ये सौर आणि पवन ऊर्जा (Solar and Wind) यांचा वापर करण्यात येतो. हायड्रोजनच्या वापरामुळे प्रदूषणही पसरत नाही.

हे सुद्धा वाचा

ग्रीन हायड्रोजन कसे काम करते?

या कारमध्ये हायड्रोजन टँकसाठी विशेष जागा करावी लागते. त्यात दोन टँक असतात. एक हायली कंप्रेस्ड आणि दुसरा लो कम्प्रेस्ड असतो. हायड्रोजन वायू हा अत्यंत ज्वलनशील असल्याने पुरेशी काळजी आणि सुरक्षा मानके पूर्ण करावी लागतात. यासाठीची साधनं अत्यंत सुरक्षीत आणि मजबूत असावी लागतात. कार सुरु करण्यासाठी आणि तिला गती देण्यासाठी लागणारी ऊर्जा ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांच्या संयुक्त प्रक्रियेतून तयार करण्यात येते. दोघांमधील रासायनिक अभिक्रियामुळे एक ऊर्जा निर्माण होते. या कारमधून धुराऐवजी H2O बाहेर पडतो. त्यामुळे प्रदूषणाला आळा बसतो.

Non Stop LIVE Update
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.