EPFO खातेदारांवर ‘आनंद’घन बरसणार ! निवृत्ती योजनेत तिप्पट वाढ

मान्सुनसोबतच EPFO खातेदारांसाठी आणखी एक आनंदवार्ता येऊन धडकली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या खातेदारांना किमान निवृत्तीत तिप्पट वाढ होण्याची शक्यता आहे.

EPFO खातेदारांवर 'आनंद'घन बरसणार ! निवृत्ती योजनेत तिप्पट वाढ
किमान पेन्शन तिप्पट होणार Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 12:03 PM

मुंबईः कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) खातेदारांसाठी खुषखबर आहे. त्यांना सरकारकडून लवकरच मोठी भेट मिळू शकते. ‘ईटी नाऊ स्वदेश‘च्या अहवालानुसार खातेधारकांच्या किमान निवृत्तीत (Pension) तिप्पट वाढीची शक्यता आहे. ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक पुढील महिन्यात होणार असल्याचे या अहवालात म्हटले आहे. या बैठकीत किमान पेन्शन (Minimum Pension) नियमात तिप्पट वाढ करण्याबाबतची महत्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत सध्याची 1,000 रुपयांची किमान निवृत्ती 3,000 रुपये करण्याची शक्यता आहे. या अहवालानुसार कामगार सचिवांच्या (Labour secretary) अध्यक्षतेखालील समिती लवकरच या प्रकरणी आपला अहवाल सादर करणार आहे. या निर्णयाचा फायदा देशातील सुमारे 6.5 लाख निवृत्तीधारक आणि ईपीएफओच्या 5 कोटी ग्राहकांना होणार आहे. व्याजदरातील कपातीची नाराजी सरकार शेअर बाजारातील गुंतवणुकीतून भरुन काढण्याच्या विचारात आहे, ईपीएफओ मधील निधी शेअर बाजारात वळविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

इक्विटीमध्ये गुंतवणूक मर्यादा वाढीची शक्यता

याशिवाय सीबीटी इक्विटीची मर्यादा 15 टक्क्यांवरून 25 टक्क्यांपर्यंत वाढवण्याबाबतही या बैठकीत चर्चा होणार आहे. पण या ठिकाणी एक पेच निर्माण झाला आहे, कामगार संघटना इक्विटीमध्ये गुंतवणूक वाढवण्याच्या बाजूने नाहीत. शेअर बाजारातील अनिश्चिततेचे कारण पुढे करत संघटनांनी या निर्णयाला विरोध केला आहे.अर्थ मंत्रालयाने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 8.1 टक्के व्याजदर जाहीर केला होता, ज्यामुळे काही दिवसांपूर्वी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या ग्राहकांना मोठा धक्का बसला होता. ही चार दशकांतील व्याजदराची नीचांकी पातळी आहे. आर्थिक वर्ष 2020-21 साठी ईपीएफ वरील व्याज दरे 8.5 टक्के होती. सरकारने व्याजदर घटवल्याच्या निर्णयाचा फटका देशभरातील 6.5 कोटी नोकरदारांना बसणार आहे. व्याजदरातील कपातीची नाराजी सरकार शेअर बाजारातील गुंतवणुकीतून भरुन काढण्याच्या विचारात आहे, ईपीएफओ मधील निधी शेअर बाजारात वळविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सध्या डेट फंडमध्ये हवा तसा परतावा मिळत नसल्याने, इक्विटीत गुंतवणूक वाढवून निर्धारीत उद्दिष्ठ गाठण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रस्तावावर विचारासाठी दोन आठवडयांपूर्वी आर्थिक गुंतवणूक आणि लेखाजोखा समितीची (finance investment and audit comittee) महत्वपूर्ण बैठक झाली होती. समितीच्या या प्रस्तावांना ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळासमोर सादर करण्यात येणार आहे. विश्वस्त मंडळाची बैठक जूनच्या शेवटच्या आठवडयात होण्याची शक्यता आहे. या बैठकीत प्रस्तावावर चर्चा करतील आणि त्यानंतर कामगार आणि अर्थमंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवतील.

हे सुद्धा वाचा

30 जूनपर्यंत पीएफचे व्याज होणार जमा

कर्मचारी भविव्य निर्वाहन निधी संघटनेने निर्वाह निधीवरील व्याजदर निश्चित केला आहे. आता पीएफच्या व्याजाची रक्कम खात्यात कधी जमा होणार याची कर्मचा-यांना उत्सुकता आहे. साधारणतः सरकार 30 जूनपर्यंत पीएफची रक्कम हस्तांतरीत करण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.