TVS कडून इथेनॉलवर चालणारी देशातली पहिली दुचाकी लाँच, किंमत फक्त….

ही स्पेशल एडिशन महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमध्ये सव्वा लाख रुपयांपेक्षाही कमी किंमतीत उपलब्ध आहे. टीव्हीएसने सर्वात आधी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ऑटो एक्स्पो 2018 मध्ये टीव्हीएस Apache RTR 200 4V इथेनॉलची संकल्पना मांडली होती.

TVS कडून इथेनॉलवर चालणारी देशातली पहिली दुचाकी लाँच, किंमत फक्त....
Follow us
| Updated on: Jul 12, 2019 | 6:19 PM

नवी दिल्ली : दुचाकी आणि तीन चाकी वाहनं बनवणारी जागतिक पातळीवरील कंपनी टीव्हीएस मोटर्सने Apache RTR 200 Fi E100 ही भारतातील पहिली इथेनॉलवर चालणारी दुचाकी लाँच केली आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत आणि टीव्हीएस मोटर्सचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन यांच्या हस्ते या मोटरसायकलचं उद्घाटन करण्यात आलं.

Apache RTR 200 Fi E100 ही दुचाकी 1 लाख 20 हजार रुपयांमध्ये खरेदी करता येईल. ही स्पेशल एडिशन महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमध्ये सव्वा लाख रुपयांपेक्षाही कमी किंमतीत उपलब्ध आहे. टीव्हीएसने सर्वात आधी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ऑटो एक्स्पो 2018 मध्ये टीव्हीएस Apache RTR 200 4V इथेनॉलची संकल्पना मांडली होती. टीव्हीएस Apache हा टीव्हीएस मोटर कंपनीचा सर्वात प्रमुख ब्रँड असून जगभरात 3.5 मिलियनपेक्षा जास्त ग्राहक या ब्रँडशी जोडलेले असल्याचं टीव्हीएसने म्हटलंय.

ऑटोमोबाईल इंडस्ट्री इलेक्ट्रिक, हायब्रीड आणि पर्यायी इंधन अशा सर्व विभागांमध्ये हरित आणि चिरस्थायी आधुनिक सुविधा निर्माण करण्याबाबत विचार करत आहे. इथेनॉलवर चालणारी उत्पादने हा आमच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाचा पर्याय आहेत.  इथेनॉलच्या बाबतीत ट्रांजिशनमध्ये सहज अनुकूलता असल्यामुळे आणि कामगिरी तसेच गाडीच्या मालकीसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चाच्या बाबतीत तडजोड करावी न लागता पर्यावरणावर होणारा सकारात्मक प्रभाव ही यामागची प्रमुख कारणे आहेत. टीव्हीएस Apache RTR 200 Fi E100 ही दुचाकी उद्योगक्षेत्रातील क्रांती आहे. ही गाडी भारतात हरित भवितव्य घडवण्याचा ट्रेंड सुरु करेल, अशी प्रतिक्रिया वेणू श्रीनिवासन यांनी दिली.

इथेनॉलचे हे विषारी नसून बायोडिग्रेडेबल आहे. हाताळणी, साठवण आणि वाहतूक या सर्व दृष्टीने सुरक्षित मानलं जातं.  हे ऑक्सिजनेटेड इंधन असून यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण 35% आहे.  त्यामुळे इथेनॉल जळत असताना त्यातून नायट्रोजन ऑक्साईड उत्सर्जनाचं प्रमाण कमी असतं. याशिवाय इथेनॉल कार्बन मोनॉक्सईड उत्सर्जन, पर्टिक्युलेट मॅटर आणि सल्फरडाय ऑक्साईड यांचं प्रमाण कमी करण्यात देखील मदत करते. इंधन म्हणून इथेनॉलच्या वापरामुळे पेट्रोलियम आयातीवर अवलंबून राहण्याचं प्रमाण कमी होईल आणि देशाची ऊर्जा सुरक्षा होण्यास मदत होत आहे. सध्या पेट्रोलमध्येही 10 ते 20 टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिसळलं जातं.

टीव्हीएस Apache RTR 200 Fi E100 वर इथेनॉल लोगोसोबत ग्रीन ग्राफिक्स देण्यात आलंय. यामध्ये ट्वीन-स्प्रे-ट्वीन-पोर्ट ईएफआय तंत्रज्ञान आहे.  गाडी चालवण्यात अधिक चांगली सुलभता, वेगवान थ्रोटल रिस्पॉन्स आणि उत्सर्जन पातळीमधील घट हे वैशिष्ट्य आहे. या दुचाकीची सर्वात जास्त शक्ती 8500 आरपीएमला 21 पीएस आणि टॉर्क 7000 आरपीएमला 18.01 एनएम आहे.  ही गाडी दर तासाला 129 किमी इतका सर्वात जास्त वेग गाठू शकते, असा दावा कंपनीने केलाय.

संबंधित बातम्या :

ही इलेक्ट्रीक कार खरेदी करा आणि सरकारकडून 1.62 लाखांचं अनुदान मिळवा

57 मिनिटात चार्जिंग, 425 किमी चालण्याची क्षमता, Hyundai ची दमदार कार

Budget 2019: महागाईचं बजेट, पेट्रोल-डिझेल महागणार, म्हणजे सर्वच महागणार!

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.