Multibagger : या शेअरची जोरदार मुसंडी, 5 महिन्यांत छप्परफाड कमाई

Multibagger : या स्टॉकने अवघ्या पाचच महिन्यात दुप्पट कमाई करुन दिली..

Multibagger : या शेअरची जोरदार मुसंडी, 5 महिन्यांत छप्परफाड कमाई
जोरदार मुसंडीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 04, 2022 | 6:34 PM

नवी दिल्ली : शेअर बाजार (Share Market) सातत्याने हेलकावे खात असला तरी काही कंपन्या जोरदार कामगिरी करत आहेत. या कंपन्यांमधील गुंतवणुकीतून शेअर होल्डरची कमाई झाली आहे. बाजाराने तेजीचा आलेख धरताच, काही कंपन्यांनी हनुमान उडी घेतली. योग्य शेअर निवडून त्यात गुंतवणूक केल्यास त्याचा फायदा गुंतवणूकदारांना (Investors) मिळतो. शॉर्ट टर्म (Short Term) गुंतवणूकदार तर काही दिवसातच मालामाल होतात. एका मल्टिबॅगर शेअरने गुंतवणूकदारांचे अचानक नशीब चमकावले आहे.

टीव्हीएस श्रीचक्र लिमिटेड (TVS Srichakra Ltd) या शेअरने गेल्या एका महिन्यात 20 टक्के वृद्धी दर नोंदविला. गेल्या सहा महिन्यात या शेअरमध्ये 85 टक्क्यांची तेजी दिसून आली. 6 जून 2022 रोजी हा स्टॉक 1686.35 रुपये होता. गेल्या शुक्रवारी हा स्टॉक 3,125.05 रुपयांवर बंद झाला.

गेल्या महिन्यात 28 तारखेला हा स्टॉक त्याच्या 52 आठवड्याच्या सर्वात उच्चांकी 3,279 अंकावर पोहचला होता. शुक्रवारी सुरुवातीच्या व्यापारी सत्रात बीएसई वर या स्टॉक जवळपास एक टक्क्यांनी वधारला. हा शेअर 3,197 वर व्यापार करत होता.

हे सुद्धा वाचा

जून 2022 मध्ये हा स्टॉक 1534 रुपयांवर होता. त्यानंतर या शेअरमध्ये जोरदार तेजी दिसून आली. हा शेअर 1590 वरुन थेट 3,200 रुपये प्रति शेअरवर पोहचला. या स्टॉकने गेल्या पाच महिन्यात 101 टक्क्यांचा मोठा परतावा दिला आहे.

या आर्थिक वर्षात (Q2 FY23) सप्टेंबरमध्ये तिमाही निकाल लागले. या कंपनीचा निव्वळ नफा 51 टक्के वाढून 38 कोटी रुपये झाला. तर एक वर्षापूर्वीच्या तिमाहीत हा नफा 25 कोटी रुपये होता. ही कंपनी टीव्हीएस समूहाची आहे. दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसाठी ही कंपनी टायर आणि ट्यूबचे उत्पादन करते.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.