Noida Twin Tower Demolition | आता म्हणतात हाय रे देवा! ट्विन टॉवरमधील गुंतवणूकदारांचे काय होणार..
Noida Twin Tower Demolition | नोए़डातील सेक्टर 93A मधील ट्विन टॉवरमध्ये सदनिका(Flat) खरेदीदारांचा हवाला आता दैवावर आहे. झटपट गुंतवणूक करणारे आता हाय रे देवा असे म्हणतं आहेत. किती गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम परत मिळाली आणि कोणाची रक्कम अडकली ते पाहुयात.
Noida Twin Tower Demolition | कुतुब मिनारहून उंच इमारतीतील अनेकांच्या सदनिकेचे स्वप्न थोड्याच वेळात क्षणभंगूर होईल. अवघ्या काही सेकंदात नोए़डातील सेक्टर 93A मधील ट्विन टॉवर (Twin Tower) जमीनदोस्त (Demolition) होईल. दुपारी 2:30 वाजता टॉवर ढासळेल. 15 सेंकदात या टॉवरचे अस्तित्व नष्ट होईल. प्रशासनाने त्याची तयारी पूर्ण केली आहे. या मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे. परिसरातील आजूबाजूच्या लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. ही महाकाय इमारत धराशाई होताना अनेकांच्या स्वप्नांचे इमले ही कोसळतील. ट्विन टॉवरमध्ये सदनिका(Flat) खरेदीदारांचा हवाला आता दैवावर आहे. झटपट गुंतवणूक (Investors) करणारे आता हाय रे देवा असे म्हणतं आहेत. नियम धाब्यावर बसवून तयार करण्यात आलेल्या या टॉवरमध्ये त्यांनी गुंतवणूक केली. पण आता त्यांच्यावर रडण्याची वेळ आली आहे. किती गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम परत मिळाली आणि कोणाची रक्कम अडकली ते पाहुयात.
आता लावला डोक्याला हात
गुंतवणूक करताना नियम धाब्यावर बसवणाऱ्या या इमारतीत अनेकांनी फ्लॅट खरेदी केले. कोट्यवधींची गुंतवणूक केली. त्यावेळी ना त्यांनी नियमांची पडताळणी केली ना प्रशासनाच्या इशाऱ्याकडे लक्ष दिले. परंतू नियमांना पाठ दाखवत तयार केलेल्या ट्विन टॉवरवर कारवाईची प्रक्रिया सुरु होताच गुंतवणूकदारांनी डोक्याला हात लावला आहे. आता त्यांच्या गुंतवणुकीचे काय झाले? त्यांची रक्कम त्यांना परत मिळाली का? ज्यांना रक्कम परत मिळालीच नाही असे किती लोक आहेत, त्याची माहिती घेऊयात.
यांचे देव पाण्यात
ट्विन टॉवरमध्ये 711 जणांना सदनिका खरेदी केल्या होत्या. त्यासाठी त्यांनी रक्कम ही अदा केली होती. यातील 652 गुंतवणूकदारांची रक्कम त्यांना परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. तर 59 जणांची रक्कम परत मिळाल्याने त्यांचे देव पाण्यात आहेत.
काय आहे सर्वोच्च आदेश?
दरम्यान ताबा रक्कमेचा परतावा न मिळाल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमुर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यांनी स्थानिक IPR ला ही रक्कम सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडे 30 सप्टेंबरपर्यंत जमा करण्याचे आदेश दिले आहे. सध्या 1 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश आहेत. तर खरेदीदारांचे एकूण 5.15 कोटी रुपये अडकल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला आहे.
गेल्या वर्षी सुनावणी
सुप्रीम कोर्टाने ट्विन टॉवर्स पाडण्याचे ऑगस्ट 2021मध्ये आदेश दिले होते. ट्विन टॉवर्सवर आज जमीनदोस्त होत आहेत. त्यामुळे, एमराल्ड कोर्ट आणि एटीएस व्हिलेज या जवळपासच्या दोन सोसायट्यांमधील सुमारे 5,000 रहिवाशांना सकाळी 7 वाजता घरे खाली करण्याचे आदेश देण्यात आले होते. रहिवाशांसोबतच 2700 वाहने आणि पाळीव प्राण्यांनाही येथून हलवण्यात येणार आहे.