Two-wheeler sales fell : दुचाकीचे चाक ‘रुतले’! विक्री प्रचंड घटली, काय कारणं? वाचा सविस्तर

Two-wheeler sales fell : दुचाकी विक्रीला ग्रहण लागले आहे. दुचाकी व्यवसायात रिव्हर्स गिअर पडला आहे. देशातील पहिल्या पाच दुचाकी वाहनांची फेब्रुवारीत एकूण विक्री 10 लाख 74 हजार 303 वाहनांची झाली आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत हे प्रमाण 25 टक्क्यांनी कमी आहे.

Two-wheeler sales fell : दुचाकीचे चाक 'रुतले'! विक्री प्रचंड घटली, काय कारणं? वाचा सविस्तर
दुचाकी (प्रातिनिधिक छायाचित्र)
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 3:35 PM

Two-wheeler sales fell : दुचाकी विक्रीला ग्रहण लागले आहे. दुचाकी व्यवसायात रिव्हर्स गिअर (Reverse gear) पडला आहे. देशातील पहिल्या पाच दुचाकी वाहनांची फेब्रुवारीत एकूण विक्री 10 लाख 74 हजार 303 वाहनांची झाली आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत हे प्रमाण 25 टक्क्यांनी कमी आहे. गेल्या सहा महिन्यांचा डेटा गोळा केला तर देशात जवळपास 7 लाख कमी दुचाकी वाहनांची विक्री झाली आहे. दुचाकी विक्रीत कमालीची घसरण वाहन उद्योगासाठी घातक ठरत आहे. कोरोनाकाळात (Corona)  कसेबसे तग धरणाऱ्या ऑटो सेक्टरला (Auto sector) सेमीकंडक्टर आणि चिप तुटवड्याचा फटका सहन करावा लागला. आता विक्रीत घट झाल्याने वाहन उद्योगाचा ताप वाढला आहे. देशात बेरोजगारीचा दर 8.35% उच्चांकी पातळीवर आहे. त्याचा परिणाम विक्रीवर होत आहे. ग्राहक वाढत्या वाहन किंमतीमुळे नवीन दुचाकी खरेदीसाठी पुढे येत नसून जुन्या वाहनांच्या खरेदीकडे अनेकांचा कल वाढला आहे.

मोपेडकडे तर ढुंकूनही पाहत नाही कोणी

एकेकाळी शान समजल्या जाणाऱ्या मोपेडकडे तर कोणी ढुंकूनही पाहत नाहीये. गेल्या वर्षी जानेवारीत एकूण 59,007 मोपेडची विक्री झाली होती. यंदा जानेवारीत हा आकडा केवळ 35 हजार 785 इतका होता. म्हणजेच एका वर्षात 23,222 मोपेडची कमी विक्री झाली आहे. विशेष म्हणजे मोपेड अथवा स्वस्त दुचाकी वाहनांमध्ये पुरवठ्याच्या कमतरतेचा कोणताही मुद्दा नाही. येथे विक्रेत्यांकडे सरासरी 25 ते 27 दिवसांचा कालावधी उपलब्ध आहे, परंतु ग्राहक राजा दुकान आणि शोरुम कडे काही केल्या फिरकत नसल्याने चिंता वाढली आहे. सेमीकंडक्टर्सचा पुरवठा खंडित होत असल्याने प्रीमियम बाइकचे उत्पादन व्यवस्थित होत नसल्याचेही टीव्हीसी मोटर्सने आपल्या निवेदनात म्हटले होते. म्हणजे स्वस्त बाइक्स बनताहेत, पण विकत नाहीत.

इतर घटकांचा प्रभाव

CMIE जाहीर केलेल्या ताज्या बेरोजगारीच्या आकडेवारी या चिंतेत भर घालणारी आहे. गेल्या आठ महिन्यांत बेरोजगारी तिच्या उच्चतम पातळीवर पोहोचली आहे. आठ महिन्यांत बेरोजगारीचा दर 8.35% या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. जानेवारीत झालेल्या अवकाळी पावसाने पीक चक्र लांबले आहे. बटाटा, तांदूळ यासारख्या पिकांसाठीचे पैसेही शेतकऱ्यांना वेळेत मिळू शकले नाहीत. मनरेगाचा पैसा न मिळाल्याने बिगरशेती उत्पन्नही मोडीत निघाले आहे. म्हणजे ग्रामीण उत्पन्नाचे दोन्ही मुख्य स्रोत आटत चालले आहेत असे म्हटले तर वावगे होणार नाही. याचा थेट परिणाम वाहन विक्रीवर होत आहे.

ग्राहकांना किंमतीत थोडीही वाढ सहन होत नाही

वाहन बाजाराबाबत तज्ज्ञांनी धोक्याची कारणे स्पष्ट केली आहेत. म्हणजे वाहन खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना किंमतीत थोडीही वाढ सहन होत नाही. तो त्याची नकारात्मक प्रतिक्रिया लगेचच व्यक्त करतो. तो वाहन खरेदीत पर्याय शोधतो. ‘क्रिसिल’च्या ताज्या अहवालानुसार कच्च्या मालाच्या किंमती महागल्यामुळे दुचाकी कंपन्यांनी चालू आर्थिक वर्षात तीन वेळा दरवाढ केली आहे. गेल्या आर्थिक वर्षात व्हीएस 6च्या निकषांमुळे वाहन उद्योगात 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली होती. दोन वर्षांत सुमारे 25 टक्के दरवाढ झाली. यापूर्वी 64 हजार रुपयांना मिळणारी अॅक्टिव्हा 71 हजार रुपयांना मिळत आहे.

आणखी वाचा :

Airtel-Axis Bank चे क्रेडिट कार्ड, फायद्याचे भंडार

RBI Alert : कोणालाही शेअर करु नका ही माहिती, नाही तर बँक खाते होईल रिकामे

नोकरी बदलतेवेळी पीएफचं काय कराल? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.